Goa 24th National Para Swimming Championships Dainik Gomantak
Video

Para Swimming Championships Goa: गोव्यात राष्ट्रीय पॅरा स्विमिंग स्पर्धेत नवा विक्रम; 518 जलतरणपटूंचा सहभाग

24th National Para Swimming Championships Goa: गोव्यात होणारी २४वी राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धा विक्रमी ठरली आहे. या स्पर्धेत देशभरातील ५१८ जलतरणपटू सहभागी झाले असून गतवर्षीच्या ४६४ स्पर्धकांची संख्या मागे पडली. कांपाल येथील जलतरण तलावात मंगळवारपर्यंत (ता. २२) स्पर्धा चालेल.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Para Swimming Competition 2024

पणजी: गोव्यात होणारी २४वी राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धा विक्रमी ठरली आहे. या स्पर्धेत देशभरातील ५१८ जलतरणपटू सहभागी झाले असून गतवर्षीच्या ४६४ स्पर्धकांची संख्या मागे पडली. कांपाल येथील जलतरण तलावात मंगळवारपर्यंत (ता. २२) स्पर्धा चालेल.

गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय यांच्यातर्फे राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण खाते यांच्या सहयोगाने आणि भारतीय पॅरालिंपिक समिती व गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने राज्यात प्रथमच पॅरा जलतरण स्पर्धेचे आयोजन होत आहे. स्पर्धेत गोव्यातील चार पॅरा जलतरणपटूंचा सहभाग आहे.

स्पर्धेची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत दिव्यांगजन सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. यावेळी राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, दिव्यांगजन सक्षमीकरण खात्याचे सचिव ई. वल्लावन, संचालिका वर्षा नाईक, राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाझिक, भारतीय पॅरालिंपिक समितीच्या पॅरा जलतरणाचे अध्यक्ष वीरेंद्र दाबास यांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"Indian Dog Go Back" ओरडत 22 वर्षीय शीख तरुणावर जीवघेणा हल्ला; ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषी नराधमांचा नंगा नाच

आघाडीपटू नेमिल याच्या खांद्यावर आक्रमणाची धुरा, FC GOAचे प्रशिक्षक मार्केझ नवोदितावर खूश

Shani Gochar 2026: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात अमाप नफा अन् शत्रूंची उडणार दाणादाण; 'या' 3 राशींवर शनिदेवाची कृपा

Goa Crime: म्हापसा हादरलं! अपार्टमेंटजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ; मृत्यूचं कारण अद्याप गुलदस्त्यात

Rajpal Yadav: विमानतळाप्रमाणे जेलमध्येही हवा 'स्मोकिंग झोन', तिहार तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवची अजब मागणी; काय म्हणाला नेमका?

SCROLL FOR NEXT