Year Ender 2022 Dainik Gomantak
मनोरंजन

Year Ender 2022: कपड्यांमुळे उर्फी जावेदसह 'या' अभिनेत्रीही झाल्या ट्रोल, ऐश्वर्याचेही यादीत नाव

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री या फॅशनमुळे ट्रोल झाल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

नवे वर्ष सुरु होण्यास काहीच दिवस राहिले आहेत. वर्षभरात अनेक गोष्टी घडल्या आहेत. ज्यातून आपण सगळे शिकतो. जर आपण बॉलिवूडकडे पाहिले तर चित्रपटांसोबतच आपल्याला स्टार्सच्या नवीनतम फॅशन ट्रेंडबद्दल देखील माहिती मिळते. अभिनेत्रींचे कपडे पाहून मुली अनेकदा आकर्षित होतात. पण कधी कधी वेगळे आणि खास होण्यासाठी या अभिनेत्री असे काहीतरी परिधान करतात त्यामुळे त्या चांगल्याच ट्रोल होतात. या वर्षीही काही अभिनेत्री असे कपडे परिधान केले होते, जे चाहत्यांना अजिबात आवडले नाहीत आणि त्या सोशल मिडियावर ट्रोल झाल्या आहेत.

New year
  • ऐश्वर्या राय

ऐश्वर्या राय या वर्षी सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत होती. पार्टी आणि कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचलेल्या ऐश्वर्या रायच्या मेकअपपासून ड्रेसिंग सेन्सपर्यंत ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर होती. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मेक-अपमुळे ट्रोल झाल्याशिवाय, आयफा अवॉर्ड्समध्ये परिधान केलेला कुर्ता आणि स्कर्ट ड्रेस पाहून लोकांनी प्रचंड ट्रोल केले. तसेच तिला स्टायलिश बदल्याचा सल्ला दिला.

Aishwarya Rai Bachchan
  • मलायका अरोरा

मलायका अरोरा तिच्या बोल्ड आणि सेक्सी लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. पण अनेक वेळा लोकांना तिचे फॅशनेबल कपडे समजत नाहीत. असाच काहीसा प्रकार ती करण जोहरच्या पार्टीत पोहोचल्यावर घडला. जिथे तिने निऑन ग्रीन कलरचे सॅटिन फॅब्रिक शॉर्ट्स आणि ब्लेझर घातला होता. ज्यामध्ये मलायकाने गुलाबी रंगाचा हाय हील्स आणि गुलाबी ब्रा टॉप घातला होता. या पार्टीत मलायकाचा हा लूक पाहिल्यानंतर लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केले.

Malaika Arora
  • भूमी पेडणेकर

भूमी पेडणेकर तिच्या अभिनयाने सर्वांचे मनं जिंकली. पण अभिनयासोबतच ती फॅशनच्या बाबतीतही कमी नाही. अनेकदा तिच्या स्टायलिश लूकचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण दिवाळी पार्टीसाठी सज्ज असलेली भूमीचा हा लूक ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. ज्यामध्ये ती बोल्ड कट ब्लाउज डिझाइनसह अतिशय वेगळ्या पद्धतीने साडी परिधान करताना दिसली. भूमीचा असा लूक पाहून चाहत्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले होते.

bhumi pednekar
  • उर्फी जावेद

उर्फी जावेद ही अतरंगी कपड्यांच्या स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी अतरंगी कपडे घालून सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. उर्फीचे हे लूक्स अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. सोशल मीडियावरील खूप ट्रोल केले गेले.

urfi javed

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT