Nasiruddin Shah Ratna Pathak Dainik Gomantak
मनोरंजन

Ratna Pathak :'नसिरुद्दीन शाह' काही बोलले तर आमच्या घरावर दगड पडतील...रत्ना पाठक असं का म्हणाल्या?

अभिनेत्री रत्ना पाठक म्हणतात जर नसीरुद्दीन शाह काही बोलले तर आमच्या घरावर दगड पडतील.

Rahul sadolikar

Ratna Pathak on Nasiruddin Shah रिअ‍ॅलिस्टिक अभिनयाचा बादशाह म्हणुन ओळखले जाणारे अभिनेते नसिरुद्दीन शाह हे नेहमीच निर्भिडपणे आपलं मत मांडत असतात. कित्येकदा त्यांची मतं सोशल मिडीयावर टीकेचं कारण बनतात. नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नी रत्ना पाठक यासुद्धा सोशल मिडीयावर आपली मतं मांडण्यात आघाडीवर असतात.

काही दिवसांपुर्वी पठाणच्या वादावर त्यांनी मत मांडलं होतं. लोकांना खायला पुरेसं अन्न नसताना तुम्ही बिकीनीच्या रंगावर वाद घालता असं म्हणुन त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आपले पती नसीरुद्दीन शाह यांनी काही मत मांडलं तर आमच्या घरावर दगड पडतील, असं त्या म्हणाल्या

रत्ना पाठक यांनी एका मुलाखतीत या गोष्टीबद्दला बोलल्या त्या म्हणाल्या " माझे पती नसीरुद्दीन शाह यांना मी अलीकडे त्यांचं मत मांडताना अडवत असते ;कारण त्यांनी जर त्यांचं मत मांडलं तर आमच्या घरावर दगड पडतील. आजकाल काम मिळणं मुश्कील झालं आहे. त्याची अनेक कारणं आहेत. पण एखादी गोष्ट चुकीची असेल तर आपण त्यावर बोलायला हवं त्याशिवाय त्या गोष्टी सुधारता येणार नाहीत."

आजकाल सोशल मिडीयावर सेलिब्रिटी आणि त्यांनी मांडलेली मतं यावर बरेच वाद होत असतात. एखाद्या संवेदनशील गोष्टीवर मत मांडताना त्याचे काय परिणाम होतील हे सांगणं मुश्कील आहे. रत्ना पाठक म्हणाल्या घरासमोर कधी कोण दगड घेवुन ऊभं राहिल हे सांगणं कठीण आहे.

रत्ना पाठक सध्या त्यांच्या आगामी गुजराती चित्रपट 'कच्छ एक्सप्रेस' या चित्रपटात व्यस्त आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

SCROLL FOR NEXT