When Amrita Singh was madly in love with Vinod Khanna

 

Dainik Gomantak

मनोरंजन

जेव्हा अमृता सिंग नवाबच्या आगोदर 'या' अभिनेत्याच्या पडली होती प्रेमात!

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. या अभिनेत्रीने सैफ अली खानसोबत लग्न केले होते जे 13 वर्षांनी ब्रेकअप झाले होते. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की, लग्नाआधीच अमृता सिंगचे इंडस्ट्रीतील एका मोठ्या अभिनेत्यासोबत आणि त्याआधीही एका प्रसिद्ध क्रिकेटरसोबत अफेअर होते. होय, मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृता सिंहचे अभिनेता विनोद खन्ना आणि क्रिकेटर रवी शास्त्रीसोबत अफेअर होते. रवी शास्त्रीसोबत अभिनेत्रीच्या लग्नाचे प्रकरणही जवळपास ठरले होते, असे म्हटले जाते.

मात्र, क्रिकेटरने लग्नानंतर अमृताने (Amrita Singh) अभिनय करायचा नाही, अशी अट ठेवली होती, त्यानंतर त्यांचे नाते तुटले. यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अभिनेता विनोद खन्ना (vinod khanna) आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'बटवारा' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमृता आणि विनोदची जवळीक वाढली होती. हे प्रकरण इतके टोकाला गेले होते की दोघांनी लग्न करण्याचा बेत आखला होता. मात्र, जेव्हा अमृता सिंगची आई रुखसाना सुलतान यांना ही बाब समजली तेव्हा त्या मुलीवर खूप चिडल्या.

विनोद खन्ना हे अभिनेत्रीपेक्षा 12 वर्षांनी मोठे होते आणि आधीच विवाहित होते, असे म्हटले जाते. रुक्साना सुलतान यांचा या प्रकरणावर आक्षेप होता. अखेर या सर्व कारणांमुळे अभिनेत्री अमृता सिंगचे विनोद खन्नासोबत लग्न होऊ शकले नाही. नशिबाचे नंतर अमृताने सैफशी (Saif Ali Khan) लग्न केले, सैफ वयाने अभिनेत्रीपेक्षा 12 वर्षांनी लहान होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT