Prema Kiran Passed Away Dainik Gomantak
मनोरंजन

सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन

ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचं वयाच्या 61 वर्षी निधन झालं. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दैनिक गोमन्तक

सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण (Prema Kiran) यांचं निधन झालं आहे. ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचं वयाच्या 61 वर्षी निधन झालं. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. अर्धांगी, धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. (Well known senior Marathi actress Prema Kiran has passed away)

80, 90 च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. दे दणादण, धुमधडाका चित्रपटातील त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती राहिली आहे. चित्रपटातील त्यांची गाणी आजही तितकीच सुप्रसिद्ध आहेत. प्रेमा किरण यांनी उतावळा नवरा, थरकाप या चित्रपटांची निर्मिती देखील केली. फक्त मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषेत त्यांनी काम करत चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT