Sushant Singh Rajput Dainik Gomantak
मनोरंजन

Sushant Singh Rajput: 'एक काळ असा होता की, मी देखील सुशांत सारखं पाऊल उचललं असतं' विवेकचा मोठा खुलासा

Sushant Singh Rajput: तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांवर या कृतीचा काय परिणाम होईल हे तू पाहिले असतेस तर हे पाऊल उचलले नसतेस.

दैनिक गोमन्तक

Vivek Oberoi remembers sushant singh rajput dark phase of life

बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात, कधी ते त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात तर कधी ते मुलाखतींमुळे तर कधी सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे हे कलाकार चांगलेच चर्चेत असतात. आता बॉलीवू़ड अभिनेता विवेक ओबेरॉय हा त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे.

विवेकने एका मुलाखतीदरम्यान, आपल्या वाईट काळाबद्दल बोलताना दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आठवण काढली होती. विवेक या मुलाखतीत म्हणाला- माझ्या आय़ुष्यातील सर्वात वाईट काळ चालू होता. सुशांतने जे स्वत:सोबत केलं तसेच विचार माझ्या डोक्यातदेखील येत होते.

एक प्रसंग आठवतोय मी जमीनीवर बसलो होतो, माझ्यासमोर माझी आई होती. मी तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि मी खूप रडलो. त्यादरम्यान मी आईसमोर माझ्या आयुष्यातील समस्यांविषयी बोलत होतो. माझ्याबाबतीतच हे का? असा प्रश्न विचारत होतो. माझ्या आईने मला शांत होऊ दिलं. ३०-३५ मिनिटांचा वेळ गेल्यावर तिने एकच प्रश्न विचारला, जेव्हा आपल्याबाबत सगळं काही चांगलं घडत असतं. तेव्हा आपण कधीतरी हा प्रश्न विचारतो का, की माझ्याबाबतीच सगळं चांगलं होत आहे.

माझ्या वाईट काळात माझ्या कुटुंबियांनी माझी फार सोबत केली, धीर दिला. नाहीतर मीदेखील सुशांतसारखेच पाऊल उचलले असते. आपण जेव्हा असे काहीतरी करण्याचा विचार करत असतो तेव्हा आपल्या जवळच्या लोकांचा विचार तुमच्या डोक्यात येणे, त्यांचा विचार तुम्ही करणे फार गरजेचे असते कारण ही लोकं तुमच्यावर नितांत प्रेम करत असतात. तुमच्या असण्यानसण्याने त्यांना फरक पडत असतो.

जेव्हा सुशांतच्या बाबतीत हे सर्व झाले, तेव्हा त्याच्या अंत्यविधीला मी हजर होतो. सुशांतच्या वडीलांना खचताना पाहिलं होतं. तिथे त्याचे शरीर पाहून माझ्या मनात एकच विचार आला, मित्रा, जर तू हे चित्र पाहिले असतेस, तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांवर या कृतीचा काय परिणाम होईल हे तू पाहिले असतेस तर हे पाऊल उचलले नसतेस.

जे तुमच्यावर खरोखर प्रेम करतात त्यांच्यासाठी तुमचे जीवन संपवून तुम्हाला किती वेदना होतात याचा विचार करा. आपण त्यांना वेदना देऊ इच्छित नाही. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा विचार करा. मी भाग्यवान होतो की माझ्याकडे ते घर आहे, माझ्याकडे ते घर आहे, माझ्याकडे ते कुटुंब आहे, ज्यांनी मला क्षणी मला साथ देतात.

विवेकच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विवेक शेवटचा रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सीरिजमध्ये दिसला होता. त्यात शिल्पा शेट्टी आणि सिद्धार्थ मल्होत्राही दिसले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SCROLL FOR NEXT