Virat and Anushka Dainik Gomantak
मनोरंजन

Virat ची अनुष्कासाठी खास पोस्ट, फोटो शेअर करत दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Virat Kohli and Anushka Sharma: लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त विराट कोहलीने शेअर केली रोमॅन्टिक पोस्ट पाहिलीत का?

दैनिक गोमन्तक

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या लग्नाला 5 वर्षे झाली आहेत. लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त त्याने अनुष्का शर्मासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक खास मॅसेज लिहिला आहे. कोहलीने 11 डिसेंबर 2017 मध्ये अनुष्कासोबत इटलीत लग्नगाठ बांधली. त्यांचा विवाह सोहळा पूर्णपणे कौटुंबिक होता आणि त्यात फार कमी लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. आता कोहलीने अनुष्कासाठी एक रोमॅन्टिक पोस्टशेअर केली आहे.

कोहलीने पोस्ट शेअर करत लिहिले, "अनंत प्रवासाची पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे." कोहली आणि अनुष्का खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि सुरुवातीला त्यांनी त्यांचे नाते फार काळ सार्वजनिकही केले नव्हते. पण, हळूहळू दोघांनीही हे नातं स्वीकारण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या नात्याचा जाहीरपणे स्वीकार केला. यानंतर कोहलीने अचानक लग्नबधंणात अडकण्याचा निर्णय घेतला आणि दोघांनीही इटलीला जाऊन लग्न केले. लग्न आटोपल्यानंतर भारतात परतल्यानंतर दोघांनी दिल्ली आणि मुंबईत मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते आणि त्यात आपल्या सर्व प्रियजनांना आमंत्रित केले होते.

बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने शानदार शतक झळकावले. शतकांच्या बाबतीत तो रिकी पाँटिंगच्या पुढे गेला. कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 72 शतके केले आहेत आणि आता तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांसह दुसरा फलंदाज बनला आहे. फक्त सचिन तेंडुलकरने कोहलीपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत 44 शतके झळकावली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT