Tamanna - Vijay Varma Dainik Gomantak
मनोरंजन

Vijay Varma - Tamanna: अखेर कबूल केलंच, विजय वर्माने तमन्नासोबतचे फोटो शेअर करत व्यक्त केले प्रेम..

साऊथची सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्माच्या अफेअरला आता उधाण आलं आहे

Rahul sadolikar

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असं म्हणतात. प्रेमाची भावना सगळ्यांसाठी सारखीच असते. सामान्य माणुस असो किंवा एखादा सेलिब्रिटी प्रेमाची परिभाषा सगळ्यांसाठी सारखीच असते. प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीही सगळ्यांसाठी सारख्याच असतात. आता तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचंच बघा ना.

बॉलीवूड आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील सध्याची चर्चा म्हणजे विजय वर्मा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया यांचं डेटिंग. गेले कित्येक दिवस दोघांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. विजय वर्माने व्हॅलेंटाईन डेला खास विश करत आपल्या प्रेयसीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

अनेक वर्षांपासून डेटिंग करत असलेल्या विजय-तमन्ना यांनी अलीकडेच गोव्यात व्हायरल होत असलेल्या लिपलॉक व्हिडिओसह डेटिंगच्या बातम्यांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, या जोडप्याने यावर कुठेही भाष्य केले नाही. 

आता विजयने हार्ट इमोजीसह तमन्नाच्या पायाचा फोटो शेअर केला आहे. विजय वर्माने यावर थेटपणे यावर काहीच सांगितलं नसलं तरी हा त्याने व्यक्त केलेल्या प्रेमाचाच एक भाग असल्याचं बोललं जातंय.

पण विजय वर्माने फोटो शेअर करताच तो कोण आहे हे चाहत्यांनी ओळखले आहे. विजय वर्मा सांगत आहेत की तमन्नाने शेअर केलेला पायाचा फोटो त्यांचा आहे. तिने शोचे फोटो आणि तमन्नाने घातलेले जर्किन शेअर केले आणि सांगितले की हा नक्कीच तमन्नाचा पाय आहे. याद्वारे विजय वर्माने आपले प्रेमप्रकरण उघड केल्याची चर्चा आहे

दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना आणि विजय वर्मा यांची पहिली भेट 'लस्ट स्टोरी-2' सिनेमाच्या सेटवर झाली होती. तिथून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली आणि पुढे प्रेमात रुपांतर झाले. दोघांचं गुपचूप प्रेमप्रकरण सुरू झालं.

 पण नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये दोघांनी मिठी मारल्याचा आणि किस केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या प्रेमाचा खुलासा झाला. आता ही जोडी लवकरच लग्नाची गुड न्यूज देणार का हे पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT