Vijay Deverakonda Dainik Gomantak
मनोरंजन

Vijay Deverakonda 'या' बॉलीवूड अभिनेत्रीसह आगामी चित्रपटात दिसणार का? फोटो होतोय व्हायरल

Vijay Deverakonda Film: विजय देवरकोंडा 'Liger' या चित्रपटात तो अनन्या पांडेसोबत दिसला होता.

दैनिक गोमन्तक

विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडे यांचा 'लाइगर' हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटाद्वारे विजयने बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले आणि त्याचा पहिला डेब्यू चित्रपट काही खास दाखवू शकला नाही. पण आता त्याला पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्रीसोबत पडद्यावर रोमान्स करण्याच्या तयारीत आहेत. शर्वरी वाघसोबतच्या त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा होणार आहे. दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यानंतर ही स्टार्सची जोडी पुढच्या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • विजय देवराकोंडा-शर्वरी वाघ

शर्वरी वाघ आणि विजय देवरकोंडा यांच्या सेटवरील हा फोटो व्हायरल होत आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री या आठवड्याच्या सुरुवातीला हैदराबादला जाताना दिसली होती. या वृत्तांमध्ये तथ्य असल्यास लवकरच एक नवीन जोडी प्रेक्षकांना चित्रपटाच्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 

Vijay Deverakonda

विजय देवरकोंडा अलीकडेच त्याच्या कथित गर्लफ्रेंड रश्मिका मंदान्नासोबत मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेला होता, जरी येथून दोघांचा एकत्र फोटो समोर आलेला नाही, परंतु रश्मिकाने एका फोटोमध्ये घातलेला सनग्लासेस विजयचा होता. या फोटोनंतर हे कपल मालदीवमध्ये एकत्र सुट्टीचा आनंद घेतांना दिसले होते.

  • शर्वरी वाघ यांनी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली

शर्वरी वाघबद्दल बोलायचे झाले तर ती विकी कौशलचा भाऊ सनी कौशलला डेट करण्याच्या बातम्यांमुळे चर्चेत राहते. याशिवाय तिने 'बाजीराव मस्तानी' आणि 'सोनू की टीटू की स्वीटी'मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. याशिवाय ती 'बंटी और बबली 2' चित्रपटात काम करताना दिसली आहे. त्याचवेळी विजयचा पुढचा चित्रपट 'जन गण मन' आहे. याशिवाय तो लवकरच 'जर्सी' दिग्दर्शक गौथम तिन्ननुरीसोबत त्याच्या पुढच्या चित्रपटात दिसणार असल्याच्या बातम्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT