Vicky Kaushal - Katrina  Dainik Gomantak
मनोरंजन

Vicky Kaushal - Katrina : याला म्हणतात प्रेम, विकी कौशल बायकोसाठी गाणं डेडीकेट करतोय..

अभिनेता विकी कौशल अलीकडे भलत्याच रोमँटिक मूडमध्ये दिसला.

Rahul sadolikar

अभिनेत्री-कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. कतरिना आणि विकी कौशल नेहमीच एका आदर्श पती- पत्नीप्रमाणे सोशल मिडीयावर दिसतात. कतरीना आता विकीच्या अलीकडेच रिलीज झालेल्या जरा हटके जरा बचकेचे कौतुक केले. 

इंस्टाग्राम स्टोरीजवर कतरिनाने विकीच्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे ज्यामध्ये तो आणि त्याची सहकलाकार सारा अली खान आहे. आपल्या पतीच्या कामाचे कतरीनाने यात कौतुक केलं आहे.

चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना कतरिना कैफने लिहिले की, "आता सिनेमागृहात (व्हाइट हार्ट इमोजी) संपूर्ण टीमचे अभिनंदन, खूप मनापासून बनवलेला चित्रपट (व्हाइट हार्ट इमोजी)." कॅटरिनाने यात टीममधील कलाकार आणि क्रूलाही टॅग केले.

Vicky Kaushal

इंस्टाग्राम स्टोरीजवर, विकीने पोस्ट पुन्हा शेअर केली. त्याने त्याचा चित्रपट जरा हटके जरा बचकेचे फिर और क्या चाहिये हे गाणे कतरीनाला डेडीकेट केलं. त्याने गाण्याच्या ट्रॅकवरून एक ओळ लिहिली, "तू है तो मुझे फिर और क्या चाहिये 

कतरिना तिच्या इन्स्टाग्रामवर अनेकदा विकीच्या पोस्ट शेअर करत असते. गेल्या महिन्यात त्याच्या वाढदिवशी कतरिनाने विकीसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. तिने लिहिले होते, "थोडा डान्स, देर सारा प्यार ….हॅपीस्ट बर्थडे माय (व्हाइट हार्ट इमोजी)."

जरा हटके जरा बचके

विक्कीच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. हा चित्रपट इंदूरमध्ये बेतलेला असून एका मध्यमवर्गीय कपलभोवती फिरतो. जरा हटके जरा बचकेमध्ये राकेश बेदी आणि इनाममुलहक यांच्याही भूमिका आहेत.

यापूर्वी विकीने एकदा म्हटले होते की, "लक्ष्मण सर आणि मॅडॉक यांच्यासोबत काम करणे हा एक आनंददायी अनुभव होता. मला चित्रपटाच्या शूटिंगसाठी, विशेषत: सारासोबत खूप छान वेळ मिळाला आणि आशा आहे की प्रेक्षकांनाही चित्रपटाचा तेवढाच आनंद मिळेल जितका आम्ही बनवला आहे. ."

विकीचा आगामी 'सॅम बहादूर'

जरा हटके जरा बचके व्यतिरिक्त विक्कीकडे सॅम बहादूर देखील आहे. सॅम बहादूर ही भारताचे युद्ध नायक आणि पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची कथा आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

कतरिना आगामी अॅक्शन-थ्रिलर चित्रपट टायगर 3 मध्ये सलमान खानसोबत दिसणार आहे. यंदाच्या दिवाळीत हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. याशिवाय तिच्याकडे विजय सेतुपतीसोबत दिग्दर्शक श्रीराम राघवनचा मेरी ख्रिसमस हा चित्रपट आहे. चाहत्यांना फरहान अख्तरच्या आगामी 'जी ले जरा' या चित्रपटात आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रासोबत कतरिना देखील दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT