Vicky Kaushal poses on horseback Photo tagged Anil Kapoor
Vicky Kaushal poses on horseback Photo tagged Anil Kapoor 
मनोरंजन

'लग रहा हूं न मजनू भाई की पेंटिंग जैसा' म्हणत विक्की कौशलने केला असा काही स्टंट

गोमन्तक वृत्तसेवा

नवी दिल्ली. बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आजकाल आपल्या 'द इम्मोर्टल अश्वत्थामा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी स्टंट करत असताना विकीने आपला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोसह विक्कीने लिहिलेले कॅप्शन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विकीने या कॅप्शनमध्ये अनिल कपूरलाही टॅग केले आहे आणि त्यामुळे चाहते या फोटोवर विविध प्रकारे कमेंट करत आहेत.

विक्की कौशलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो घोड्याच्या पाठीवर उभा असल्याचे दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना विक्कीने लिहिले- “मी दिसत आहे न मजनू भाईच्या पेंटिंगसारखा?” फोटोमध्ये विकी कौशल ज्या प्रकारे घोड्याच्या वर स्वतःला संतुलित ठेवताना दिसतो तो खरोखर स्तुत्य आहे.

दरम्यान अभिनेत्याचे कौतुक करूनदेखील चाहते थकलेले नाहीत. गेल्या काही तासांमध्ये या फोटोला 446,660 पेक्षा जास्त लिक्स मिळाल्या आहेत. विक्कीने अनिल कपूरलाही फोटोत टॅग केले आहे.

टायगर श्रॉफ, शशांक खेतान, सयानी गुप्ता या सर्व स्टार्सनीही फोटोवर भाष्य केले आहे. त्याचवेळी टायगर श्रॉफने कमेंट बॉक्समध्ये क्रेझी लिहिले आहे. या स्टंटवर सयानी गुप्ता विक्कीच्या या फोटोवर खूप प्रभावित झाली आणि तिने आश्चर्यकारक अशी कमेंट या पोस्ट ला दिलील आहे. शशांक खेतान यांनी व्वा .. व्वा अशी कमेंट केली आहे.

2007 साली रिलीज झालेल्या वेलकम या चित्रपटात अनिल कपूरने मजनू भाई नावाची व्यक्तिरेखा साकारली होती, जी प्रत्यक्षात गुंडाची होती आणि त्यांला त्यात चित्रकलेचा शौक होता. अनीस बज्मी दिग्दर्शित या अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपटात अनिल कपूर मल्लिका शेरावत यांना एका कला लिलावात भेटला ज्यात अभिनेत्री अशी चित्रकला खरेदी करते जिच्यावर घोडाच्या माथ्यावर एक गाढव ठेवलेले असते. वेलकममध्ये अक्षय कुमार, नाना पाटेकर, कतरिना कैफ आणि मल्लिका शेरावत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Russian In Goa: मद्यधुंद रशियन जोडप्याचा शिवोलीत राडा; पोलिसांसोबत हुज्जत, 108 ची मदत नाकारली

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

Goa Loksabha Voting: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानाला गोव्यात सुरुवात

Amit Shah Fake Video Case: अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना समन्स, दिल्ली पोलिस करणार चौकशी

Goa Today's Live News Update: धारगळ येथे उच्चदाब वीजवाहिनीला धक्का, सहा वीजखांब कोसळले

SCROLL FOR NEXT