Ved Trailer Releases Dainik Gomantak
मनोरंजन

Ved Trailer Releases: रितेश-जेनेलियाच्या 'वेड' चा दमदार ट्रेलर आउट

रितेश आणि जेनेलियाची जोडी अनेक दिवसांनंतर रिल लाइफमध्ये पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील क्युट कपल म्हणून ओळखले जाणारे रितेश-जेनेलियाचा आगाची वेड चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला आहे. एकतर्फी प्रेम आणि त्यामधील वेड असा एकंदर चित्रपटाचा विषय आहे. रितेश-जेनेलियाची रिअल लाइफ जोडी अनेक दिवसांनंतर रिल लाइफमध्ये चाहत्यासमोर येणार आहेत.

वेड चित्रपटामध्ये रितेशचा (Ritesh Deshmukh) गंभीर लुक आणि जेनेयियाची मराठी भाषा पसंतीस पडणार आहे. एकतर्फी प्रेम, विरह, नवरा बायकोमधील नातं या चित्रपटामधून मांडले आहे. जेनेलियाला पहिल्यांदाच मराठी बोलतांना पाहून चाहते आनंदी झाले आहेत. यामधील गाणी, रितेश-जेनेलियाची जोडी पाहून चाहत्यांना ट्रेलरची (Trailer) प्रचंड उत्सुकता होती. आता ट्रेलर रिलीज होताच अनेक व्ह्युज मिळाले आहे. या चित्रपटामध्ये तुम्हाला अशोक शराफ (Ashok Sharaf) यांची झलकही पाहायला मिळते.

हा चित्रपट येत्या 30 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीज आधीच हा चित्रपट सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या यादीत (IMDB) पहिल्या क्रमांकावर आहे. 

'वेड' मध्ये जेनेलिया देशमुख, रितेश देशमुख, अशोक सराफ, विद्याधर जोशी आणि शुभंकर तावडे मुख्य भूमिकेत आहेत. तर आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांनी या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहे. तर मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. आता रितेश-जेनिलियाचे चाहते या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT