Urvashi Rutela Rishabh Pant 
मनोरंजन

Urvashi Rautela: ते ‘आय लव्ह यू’ ऋषभ पंतसाठी नव्हते; उर्वशीचे स्वतःच्या व्हिडिओवर स्पष्टीकरण

क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या मागोमाग ऑस्ट्रेलियाला गेली उर्वशी

गोमन्तक डिजिटल टीम

Urvashi Rautela: अभिनेत्री, मॉडेल उर्वशी रौतेला अलीकडच्या काळात सतत चर्चेचा विषय ठरली आहे. दररोज तिच्याविषयी काही नाही काही सोशल मीडियातून समोर येत असते. आताही तिने इस्टाग्राम स्टोरीवरून स्वतःकडे लक्ष वेधून घेतले आहे.

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्रामवरून एक स्टोरी शेअर करत स्वतःच्याच एका व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले आहे. या जुन्या व्हिडिओत उर्वशीने आय लव्ह यू, असे म्हटले होते. पण, त्या आय लव्ह यू चा कुणाशीही कसलाही संबंध नव्हता, असे उर्वशीने आता स्पष्ट केले आहे. व्हिडीओ उर्वशीने खूप दिवस आधीच बनवला होता.

तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, अलीकडच्या दिवसात सगळीकडे पसरलेल्या व्हिडिओबाबत मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छिते. ते वाक्य मी केवळ अभिनयाच्या उद्देशाने बोलले होते. तो एक डायलॉग होता, ते एक दृश्य होते. ते कुणासाठी उद्देशून केलेले वक्तव्य नव्हते, किंवा व्हिडिओ कॉलवर ते कुणाशीही बोलले गेले नव्हते. त्या व्हिडिओमध्ये उर्वशी आय लव्ह यू म्हणताना दिसते. उर्वशी म्हणते की, 'आधी तू आय लव्ह यू म्हण. नाही, आधी तुच आय लव्ह यू बोल. एकदा म्हण आय लव्ह यू. फक्त एकदा म्हण.'

उर्वशीने सांगितल्यानुसार तो केवळ एक डायलॉग होता, त्याचा इतर कशाशीही काहीही संबंध नव्हता. तथापि, नेटकऱ्यांनी मात्र त्याचा वेगळाच अर्थ काढला होता.

गेल्या काही काळात उर्वशीचे नाव भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत याच्याशी जोडले जात आहे. त्यामुळे उर्वशीचे ते वक्तव्य ऋषभला उद्देशूनच होते, अशी दाट शक्यता सर्वांनाच वाटून गेली होती. तसेच ऋषभच्या मागोमाग उर्वशीही ऑस्ट्रेलियाला गेली होती. ऋषभ भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात आहे. याची सुरवात ऑगस्टमध्ये झाली होती. तेव्हा उर्वशीने एका मुलाखतीत 'मिस्टर आरपी' माझ्यासाठी हॉटेलच्या लॉबीत १० तास वाट पाहत होता, त्याने मला अनेक कॉल केले, असे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT