urfi javed
urfi javed Dainik Gomantak
मनोरंजन

Urfi Javed ला अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस

दैनिक गोमन्तक

Urfi Javed-Chitra Wagh Controversy: महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि भाजप नेत्या चित्रा किशोर वाघ आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये वाद सुरुच आहे. दररोज सोशल मिडियावर त्या दोघी एकमेकींना सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत. या वादाची ठिणगी चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर घेतलेल्या आक्षेपामुळे पडली. चित्रा वाघ यांनी थेट मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली. आता मुंबई पोलिसांनी उर्फीला अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.

मुंबईतील (Mumbai) अंबोली पोलीस ठाण्यात उर्फी जावेद विरोधात चित्रा वाघ यांनी तक्रार दाखल केली होती. गेले काही दिवस पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नव्हती. पण आता अंबोली पोलिसांनी उर्फीला नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमध्ये त्यांनी 14 जानेवारी रोजी उर्फी जावेदला अंबोली पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे.

चित्रा वाघ यांच्या नोटीसीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. पोलीस आयुक्तांनी याची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता उर्फीला अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

SCROLL FOR NEXT