Urfi Javed  Dainik Gomantak
मनोरंजन

Urfi Javed थोडक्यात बचावली... नृत्य करताना झोपाळ्यावरून पडली

अलिकडेच उर्फी जावेदचे लेटेस्ट 'हाय हाय ये मजबूरी' हे गाणे रिलीज झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सोशल मीडिया क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या उर्फी जावेदचा परिचय करून द्यायची गरज नाही. अलिकडेच उर्फी जावेदचे लेटेस्ट 'हाय हाय ये मजबूरी' हे गाणे रिलीज झाले आहे. उर्फीचे हे गाणे सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद एका झोपाळ्यावर नृत्य करताना दिसत आहे. पण, नृत्य करताना एक छोटा अपघात होतो आणि उर्फी थोडक्यात बचावते.

सोशल मीडिया सेन्सेशन असलेली उर्फी दररोज काहीतरी बातमी हेडलाईन्स निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. उर्फी जावेदने नुकताच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. उर्फी जावेदचा हा व्हिडिओ तिच्या हाय ही ये मजबूरी गाण्याचा बीटीएस व्हिडिओ आहे.

या व्हिडिओत उर्फी जावेद झोपाळ्यावर नाचताना दिसत आहे. नाचत असताना अचानक उर्फी जावेदचा पाय घसरून ती खाली पडते. या अपघातात उर्फी जावेदला कोणतीही दुखापत झालेली नाही, पण, ती थोडक्यात बचावली. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये उर्फीने 'ये तो सच का ही ही हो गया' असे लिहिले आहे.

उर्फी जावेदने बॉलीवूड अभिनेत्री झीनत अमानचे आयकॉनिक गाणे हाय ही ये मजबूरी तिच्या शैलीत रिमेक केले आहे. सहा दिवसांपूर्वी उर्फीचे 'हाय ही ये मजबूरी' हे गाणे रिलीज झाले. उर्फी जावेदच्या या गाण्याला आतापर्यंत सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, 97 हजार लोकांनी ते लाइक केले आहे. एवढेच नव्हे तर उर्फी जावेदचे हे गाणे सध्या ट्रेंडींग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT