Rockstar Yash DainikGomantak
मनोरंजन

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Rockstar Yash New Movie Toxic: कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स' चित्रपट आज (26 ऑगस्ट) चित्रपटगृहात रिलीज झाला.

Manish Jadhav

Rockstar Yash New Movie Toxic: कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स' चित्रपट आज (26 ऑगस्ट) चित्रपटगृहात रिलीज झाला. पहिल्याच दिवशी पहिल्या शोपासूनच चित्रपटगृहांबाहेर चाहत्यांनी तोबा गर्दी केली. 'केजीएफ: चॅप्टर 2'च्या अफाट यशानंतर यश मोठ्या पडद्यावर परतल्याने त्याच्या चाहत्यांच्या उत्साह गगनात मावेनासा झाला आहे. बंगळुरु, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीसह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये भल्या पहाटेपासूनच थिएटरबाहेर चाहत्यांनी ही गर्दी केली.

कर्नाटकमध्ये यशच्या चाहत्यांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरत आहे. बंगळुरु येथील केम्पेगौडा रोडवरील प्रसिद्ध 'नर्तकी' आणि 'संतोष' टॉकीजबाहेर पहाटेपासूनच हजारो चाहत्यांनी गर्दी केली. यशच्या पडद्यावरील धमाकेदार एन्ट्रीवर प्रेक्षकांनी शिट्ट्या, टाळ्या आणि घोषणाबाजी करत संपूर्ण थिएटर डोक्यावर घेतले. रायचूर आणि शिवमोग्गा सारख्या शहरांमध्येही असाच जल्लोष पाहायला मिळत आहे. रायचूर येथील आयनॉक्स मॉलच्या तिन्ही स्क्रीनवरील सर्व शो 'हाऊसफुल्ल' झाले असून, लांबून आलेल्या चाहत्यांनी 'टॉक्सिक' टी-शर्ट घालून, हातात यशचे भलेमोठे बॅनर्स आणि फटाक्यांची आतिषबाजी करत चित्रपटाचे स्वागत केले.

चित्रपटाची ही क्रेझ केवळ कर्नाटकापुरती मर्यादित नसून हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीतही पाहायला मिळत आहे. हैदराबादमधील चित्रपटगृहांबाहेर विशेष शोसाठी चाहत्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. तसेच, मुंबई आणि दिल्लीसारख्या मेट्रो शहरांमध्ये अ‍ॅडव्हान्स तिकीट बुकिंगला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे चित्रपटगृह मालकांनी पहाटेचे आणि रात्रीचे अतिरिक्त शो जोडण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावर सध्या 'टॉक्सिक'च्या फेस्टिव्हलचे अनेक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून ज्यामध्ये चाहत्यांचे प्रेम आणि चित्रपटगृहांबाहेरील थरारक वातावरण स्पष्टपणे दिसून येत आहे. रॉकस्टार यशचे हे पुनरागमन केवळ एका चित्रपटाचे प्रदर्शन नसून त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठा उत्सव ठरले आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट नवीन कमाईचे विक्रम प्रस्थापित करेल, असा ठाम विश्वास चित्रपट विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT