Tokyo Olympic Gold medalist Neeraj Chopra in KBC Dainik Gomantak
मनोरंजन

KBC च्या फॅन्टास्टिक फ्रायडेचा प्रोमो व्हायरल , गोल्डन बॉय नीरज चोप्रा हॉट सीटवर

कौन बनेगा करोडपती (KBC) 13 च्या भव्य शुक्रवारचा प्रोमो रिलीज झाला असून यावेळी शोमध्ये ऑलिम्पिक (Tokyo Olympic) पदक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि पी श्रीजेश (Shreejesh) दिसणार आहेत.

दैनिक गोमन्तक

कौन बनेगा करोडपती (KBC) 13 च्या भव्य शुक्रवारचा प्रोमो (Promo) रिलीज झाला असून यावेळी शोमध्ये ऑलिम्पिक (Tokyo Olympic) पदक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि पी श्रीजेश (Shreejesh) दिसणार आहेत. कौन बनेगा करोडपती मध्ये पुढच्या शुक्रवारी स्पेशल शोमध्ये टोकियो ऑलिम्पिकमधील पदक विजेते असणार आहेत .कौन बनेगा करोडपतीचा हा सीजन 23 ऑगस्ट रोजी सुरू झाला आणि तेव्हापासून बातम्यांमध्ये आहे. फॅन्टास्टिक फ्रायडेचा एपिसोड दर शुक्रवारी प्रसारित होतो. शोचा हा तेरावा सीझन आहे. (Tokyo Olympic Gold medalist Neeraj Chopra in KBC)

काल शुक्रवारच्या एपिसोडमध्ये दीपिका पदुकोण आणि फराह खान या दोघी आल्या होत्या . पुढच्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा आणि पी श्रीजेश दिसतील. त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांच्या कामगिरीने मने जिंकली आहेत. शुक्रवारचा पहिला प्रोमो रिलीज झाला असून पी श्रीजेश आणि नीरज चोप्रा त्यात मस्ती करताना दिसत आहेत.

व्हिडीओ शेअर करताना, कौन बनेगा करोडपतीच्या निर्मात्यांनी लिहिले आहे, 'कौन बनेगा करोडपती 13 च्या पुढील शुक्रवारच्या भागात टोकियो ऑलिम्पिक 2020 चा सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आणि पी. राजेश येणार आहेत . 17 सप्टेंबर रात्री 9:00 वाजता हा स्पेशल एपिसोड प्रसारित होणार आहे . या प्रसंगी नीरज चोप्रा अमिताभ बच्चन यांना हरियाणवी शिकवण्याचा प्रयत्न करतील.'

नीरज चोप्राने टोकियो ऑलीम्पिक मध्ये भालाफेक या खेळात सुवर्णपदक पटकावले आहे, तर पी श्रीजेश हा हॉकी संघाचा सदस्य आहे. भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक पटकावले आहे. यावेळी भारताची कामगिरी ऑलिम्पिक मध्ये खूप चांगली झाली आहे. यामुळे भारताला अनेक पदके देखील मिळाली आहेत. नीरज चोप्राचे पदक जिंकल्यानंतर त्याच्या चाहत्यांची संख्या वाढली आहे.आणि त्यातच हा शो म्हणजे पर्वणीच ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT