tiger shroff akshay kumar dance video Dainik Gomantak
मनोरंजन

Viral Video: 'मै खिलाडी तु अनाडी' गाण्यावर अक्षय अन् टायगरचा भन्नाट डान्स, Video तुफान व्हायरल

बॉलिवूडचे दोन मोठे अॅक्शन हिरो अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

Tiger Shroff Akshay Kumar Dance Video: बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळख असलेल्या अक्षय कुमारने आज सोशल मिडियावर आपला एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो त्याच्या जबरदस्त स्टाइलमध्ये डान्स करताना दिसला. या व्हडिओमध्ये दोन्ही स्टार्स 'मैं खिलाडी तू अनाडी' गाण्यावर त्यांचा भन्नाट डान्स पाहायला मिळत आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

अक्षय कुमार सध्या रिलीज होणाऱ्या 'सेल्फी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याने 'सेल्फी' मधील नुकत्याच रिलीज झालेल्या 'मैं खिलाडी' या गाण्यावर टायगरसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. या दोघांना रुपेरी पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची प्रतीक्षा संपत आली आहे.

'मैं खिलाडी'वर अक्षय कुमार अन् टायगर श्रॉफचा डान्स

अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टायगर श्रॉफसह नुकत्याच रिलीज झालेल्या मैं खिलाडी गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हे गाणे 'मैं खिलाडी तू अनारी' या लोकप्रिय जुन्या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आहे. मूळ व्हिडिओमध्ये अक्षय आणि इमरान हाश्मी दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये अक्षयसोबत टायगरचा डान्स पाहणे ही खरोखरच चाहत्यांसाठी ट्रीट आहे.

या दोघांनी काळ्या रंगाचा ड्रसे परिधान केला आहे. टायगर काळ्या कार्गो पॅंटवर आणि बूटांवर काळी बनियान घातलेला दिसतो तर अक्षयने काळ्या पँटवर काळा शर्ट घातलेला आहे. दोन्ही अभिनेते धडाकेबाज दिसतात आणि त्यांच्या स्टेप्स उत्तम प्रकारे जुळतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT