Richest Actresses In Bollywood  Dainik Gomantak
मनोरंजन

Top 5 Richest Actresses: 'या' आहेत बॉलीवुडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्री

चित्रपटासाठीच्या मानधनासह जाहीरातींमधूनही मिळवतात बक्कळ पैसे

गोमन्तक डिजिटल टीम

हिंदी चित्रपटसृष्टीत एकेकाळी कमाईच्या बाबतीत अभिनेत्यांची स्थिती अभिनेत्रींपेक्षा जास्त चांगली असायची. पण आता बी टाऊनच्या अभिनेत्री देखील करोडो रूपयांत मानधन घेतात आणि स्वतःच्या हिंमतीवर लक्झरीयस आयुष्य जगतात. बॉलीवुडमधील अशाच सर्वात श्रीमंत पाच अभिनेत्रींविषयी जाणून घेऊयात.

Aaishwarya Rai-Bachchan

ऐश्वर्या राय-बच्चन

ऐश्वर्या राय-बच्चनची एकुण संपत्ती 775 कोटी रूपये इतकी आहे. ऐश्वर्या प्रत्येक चित्रपटासाठी जवळपास 10 ते 12 कोटी रूपये मोबदला घेते. याशिवाय विविध ब्रँडच्या जाहिरातींमधुन ती वर्षाकाठी 80 ते 90 कोटी रूपये कमावते.

Kareena Kapoor

करीना कपूर

बॉलीवुडची बेबो अभिनेत्री करीना कपूरची एकुण संपत्ती ४१३ कोटी रूपये इतकी आहे. तिची वार्षिक कमाई साधारण 73 कोटी रूपये इतकी आहे.

Priyanka Chopra

प्रियंका चोप्रा

देसी गर्ल प्रियांका चोप्रा-जोनास ही सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. बॉलीवूडसोबतच हॉलीवूडमध्येही तिचे चित्रपट येत असतात. प्रियांकाची एकुण संपत्ती साधारण 270 कोटी रूपये इतकी आहे. चित्रपटांशिवाय ती विविध कंपन्यांची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तसेच टीव्ही सीरीजमध्येही ती काम करत असते.

Anushka Sharma

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा प्रत्येक चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी रूपये मानधन घेते. तर एका जाहिरातीसाठी ती 4 ते 5 कोटी रूपये मोबदला घेते. अनुष्काकडेही अनेक जाहीराती आहेत. शिवाय ती क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी आहे. तिची एकुण संपत्ती 265 कोटी रूपये इतकी आहे.

Deepika Padukone

दीपिका पदुकोण

अभिनेत्री दीपिका पदुकोन सध्याची बॉलीवुडमधील आघाडीची तारका आहे. दीपिका प्रत्येक महिन्याला 2 कोटी रूपये कमावते. त्यामुळे तिची वार्षिक कमाई 24 कोटी रूपये इतकी होते. दीपिकाची एकुण संपत्ती 225 कोटी रूपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT