Mahi Vij - Jay Bhanushali Dainik Gomantak
मनोरंजन

Mahi Vij - Jay Bhanushali : अभिनेत्री माहीच्या मुलीला नमाज पढताना पाहुन नेटकरी संतापले...तिनेही दिलं थेट उत्तर

टिव्ही जगतातील प्रसिद्ध जोडपे माही वीज आणि जय भानुशाली यांच्या मुलीचा नमाज पढतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

Rahul sadolikar

टीव्हीवरील लोकप्रिय जोडपे माही विज आणि जय भानुशाली हे नेहमी लाइमलाईटमध्ये राहतात. त्यांच्याबरोबरच त्यांची मुलगी मुलगी तारा देखील प्रसिद्धीच्या झोतात राहते. दोघेही मुलीमुळे चर्चेत राहतात. माही छोट्या पडद्यापासून दुर असली तरी ती सोशल मिडियावर खुप सक्रिय असते.

माहीने इन्स्टाग्रामवर शेअर केली पोस्ट

माहीने तिची मुलगी ताराच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला. जो थोड्या वेळातच व्हायरल झाला. यामध्ये तारा ही नमाज पठण करतांना दिसत होती. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताच काही लोकांनी ताराला खुप ट्रोल केलं. लोकांनी तिला खुपच वाईट कमेंट केल्या.

माही विजचे चोख उत्तर

या पोस्टला आलेल्या नकारात्मक कमेंटला आता अभिनेत्री माही विजने देखील चांगलाच उत्तर दिलं आहे. तिने ट्रोल करणाऱ्यांचा जोरदार क्लास घेतला.

त्यानंतर माहीने तिच्या मुलीचा आणखी एक व्हिडिओ शेयर केला आणि लिहिलं की, 'हे त्या मुर्ख लोकांसाठी आहे ज्यांनी धर्माची चेष्टा केली आहे. तुम्ही ताराला अनफॉलो करू शकता. तिला असंही द्वेष करणारे लोक नको आहेत.'

मला कळतं मी एक आई आहे

पुढे ती लिहिते, 'मी स्वतः एक आई असल्यानं मला माहित आहे की मी तिला काय शिकवत आहे. मनाने लहान असणाऱ्या लोकांना शुभेच्छा. इतका द्वेष पाहून वाईट वाटले. माझ्या मुलीची काळजी करू नका, तुमच्या मुलांना शिकवा.या व्हिडिओत माही आणि तारा एका मंदिरात प्रार्थना करताना दिसत आहे.'

माहीचाही व्हिडीओ व्हायरल

आता माहीचा हा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी तिचं समर्थन केलं आहे तर अनेकांनी तिच्यावर पुन्हा टिका केली आहे.

काही दिवसांपुर्वीही माही आणि तारा एका कार्यक्रमात दिसले होते. यावेळीही 4 वर्षांच्या ताराच्या चेहऱ्यावर लिपस्टिक आणि आय लाइनर लावल्याने नेटकऱ्यांनी माहीला ट्रोल केलं होते.त्यावेळीही माहीनं लोकांना सुनावलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nicholas Pooran Century: 13 षटकार, 5 चौकार, 321 चा स्ट्राइक रेट… निकोलस पूरननं ठोकलं वादळी शतक; गोलंदाजांची काढली पिसं VIDEO

Shukra Gochar 2026: नशिबाची साथ अन् अफाट पैसा! शुक्राचा स्वतःच्याच नक्षत्रात महाप्रवेश! 'या' 5 राशींचे नशीब पालटणार; राजासारखे जीवन जगणार

Droupadi Murmu: श्री जगन्नाथ दर्शनार्थ पुरीच्या विशाल पथावर...

खरी कुजबुज: उच्चशिक्षितही फसतात

Goa Investigation: सॅम्युअल ब्रागांझा मृत्यू प्रकरणाचा तपास अद्याप रखडलेलाच; आत्महत्येच्या प्राथमिक संशयानंतरही पडद्यामागचे गूढ वाढेना

SCROLL FOR NEXT