Avatar: The way of water  Dainik Gomantak
मनोरंजन

Avatar-The way of water: अवतार 2 बघताना थिएटर मध्ये प्रेक्षकाचा मृत्यू , हे होतं कारण

आंध्रप्रदेशातल्या काकीनाडा इथं अवतार 2 हा सिनेमा बघत असताना एका प्रेक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Rahul sadolikar

आंध्रप्रदेशच्या काकीनाडा इथं जेम्स कॅमेरुनचा अवतार हा सिनेमा बघताना एका प्रेक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिनेमा बघत असताना अचानक हा प्रेक्षक बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला; आणि काही वेळातच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

जेम्स कॅमेरुनचा बहुचर्चित अवतार 2 हा सिनेमा आंध्रप्रदेशात एका थिएटर मध्ये लागला होता. चित्रपट सुरू झाला आणि अचानक लक्ष्मीरेड्डी श्रीनू नावाचा एक प्रेक्षक ओव्हर एक्साईट झाल्यामुळे जमिनीवर पडला. त्याला त्वरीत जवळच्या हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

लक्ष्मीरेड्डीच्या मृत्युचे कारण सांगताना डॉक्टर म्हणाले कि, त्याला सुरुवातीपासुनच ब्लड प्रेशरचा त्रास होता. सिनेमा बघताना लक्ष्मीरेड्डी खुप जास्त एक्साईट झाला आणि त्याचं ब्लड प्रेशर खुप वाढलं. त्याचा परिणाम म्हणजे लक्ष्मीरेड्डीला हृदयविकाराचा झटका आला.

2009 साली तैवानमध्ये अशाच पद्धतीने अवतार सिनेमा बघताना प्रेक्षक मरण पावल्याची घटना घडली होती. तैवानमधल्या 42 वर्षीय व्यक्तीला अवतार सिनेमा बघतानाच हृदयविकाराचा झटका आला होता.

दिग्दर्शक जेम्स कॅमेरुनचा अवतार 2 म्हणजेच अवतार: द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा त्याच्याच 2009 साली आलेल्या 'अवतार'चा सिक्वल आहे. 16 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज झाला आणि दोनच दिवसांत सिनेमाने 86 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT