The Kashmir Files Dainik Gomantak
मनोरंजन

'द काश्मीर फाइल्स'ने मोडला 'दंगल'चा रेकॉर्ड

दैनिक गोमन्तक

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. या चित्रपटाने 8 व्या दिवशी 100 कोटींचा गल्ला जमवून अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. 'द काश्मीर फाइल्स'ने 8 व्या दिवशी कमाईच्या बाबतीत आमिर खानच्या (Amir Khan) दंगलचा मागे टाकले आहे.

विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करून लिहिले, 'द काश्मीर फाइल्स'ने इतिहास रचला आहे. या चित्रपटाने 8व्या दिवशी 19.15 कोटींची कमाई केली. हे कलेक्शन बाहुबली 2 (19.75 कोटी) च्या जवळ आहे आणि दंगल (18.59 कोटी) पेक्षा जास्त आहे. हे दोन्ही चित्रपट 'आयकॉनिक हिट' आहेत. 'काश्मीर फाइल्स' ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी चित्रपटाने 19.15 कोटींची कमाई केली. भारतीय या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 116.45 कोटींवर गेले आहे.

दुसऱ्या वीकेंडला हा चित्रपट 150 कोटींचा टप्पा पार करेल. 'काश्मीर फाइल्स'ने 8व्या दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे. हा चित्रपट (Movie) तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम भाषेतही डब केला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

Goa Today's News Live: म्हापशात भेसळयुक्त 200 किलो बडीशेप जप्त

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT