खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य
BailDainik Gomantak

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Goa Crime: भगवती कॉलनी दवर्ली येथे २०२० मध्ये मुजाहिद खान याचा चाकू भोसकून खून करण्यात आला होता.
Published on

रुमडामळ: दवर्ली भगवती येथे २०२० मध्ये मुजाहिद खान याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित इस्माईल मुल्ला ऊर्फ छोटू याला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांचा जामीन अटीच्या शर्तीवर देण्यात आलेला आहे. संशयिताला लग्नसमारंभ स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणी जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

भगवती कॉलनी दवर्ली येथे २०२० मध्ये मुजाहिद खान याचा चाकू भोसकून खून करण्यात आला होता. या खून प्रकरणात सादिक बेल्लारी व इस्माइल मुल्ला ऊर्फ छोटू या दोघांना अटक करण्यात आलेली होती.

गेल्यावर्षी जूनमध्ये या प्रकरणातील संशयित सादिक बेल्लारी याला जामीन मिळालेला होता. मात्र, तो जामिनावर सुटल्यावर मुजाहिदीनचा भाऊ कादर खान याने आपल्या आणखी एका मित्राच्या साहाय्याने त्याचा खून केला होता.

या पार्श्वभूमीवर रुमडामळ दवर्ली येथे पुन्हा एकदा तणाव होऊ नये यासाठी इस्माईलच्या फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. २५ हजारांचा वैयक्तिक जातमुचलका तसेच तेवढ्याच किंमतीचा हमीदार सादर करावा कोणत्याही साक्षीदाराला धमकावू नये. भावाचे लग्न असलेल्या ठिकाणीच उपस्थित राहता येणार अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com