‘गोबेलिन्स’चे लघुपट आमची संपत्ती Dainik Gomantak
मनोरंजन

‘गोबेलिन्स’चे लघुपट आमची संपत्ती

सेसिल ब्लाँडेल यांनी घेतला ‘मास्‍टर क्‍लास’(Master Class)

दैनिक गोमन्तक

पणजी: ‘गोबेलिन्स गेल्या45 वर्षांपासून आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून लघुपट बनविण्यास सांगते. हे चित्रपट आमच्यासाठी एक प्रकारची संपत्ती आहे, असे गोबेलिन्स स्कूल ऑफ इमेजच्या सेसिल ब्लॉंडेल यांनी आज सांगितले. त्या गोव्यात (Goa) सुरू असलेल्या 52 व्या इफ्फीत (52 IFFI) आयोजित ‘लघुपट (Short Film) का बनवावेत?’ या विषयावरील आभासी मास्टर क्लासमध्ये (Master Class) बोलत होत्या.

लघुपटाचे (Short Film) महत्त्‍व विषद करताना सेसिल ब्लॉंडेल म्हणाल्या, अमेरिकेत 59 मिनिटांपेक्षा कमी आणि यूकेमध्ये 50 मिनिटांपेक्षा कमी कालावधीच्या चित्रपटांना लघुपट मानले जाते. प्रेक्षकांकडून वाढती मागणी येत असल्यामुळे गेल्या काही वर्षात लघुपटांच्या निर्मितीमध्ये वाढ झाली आहे. लोक प्रवास करताना अथवा त्यांना ज्यावेळी सवड असेल त्यावेळी आपल्या फोनवरही (Phone) लघुपट पाहू शकतात. त्‍यामुळे लोकांमध्ये लघुपटांविषयी (Short Film) आकर्षण वाढले आहे, असे त्‍यांनी नमूद केले.

चित्रपट (Movie) उद्योग क्षेत्रातल्या मोठ्या मंडळींच्या दृष्टीने लघुपट विभाग किती महत्त्‍वाचा आहे आणि त्याकडे किती गांभीर्याने पाहिले जाते यावर भर देताना ब्लाँडेल यांनी माहिती दिली की, आता पिक्सरने आपला लघुपट विभाग सुरू केला आहे आणि ते या विभागाला व्यावसायिक विभाग म्हणून महत्त्‍व देत आहेत. लघुपट आकर्षक का असतात, या विषयीच्या कारणांची चर्चा करताना त्‍या म्हणाल्या, एक तर त्या कमी खर्चात बनतात त्यामुळे जोखीम कमी असते. त्याचबरोबर लघुपट तुम्ही एकट्यानेच बनविण्याची स्वायत्तताही मिळते.

लहान व्हिडिओचे (Video) तुम्ही केलेले काम स्टुडिओंमध्ये दाखवू शकता. त्यामुळे प्रदर्शनासाठी इतर अडथळ्यांना पार करणे सहज शक्य असते. चित्रपट निर्मितीच्या कलेमध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी लघुपट तयार करणे हे एक उत्तम साधन आहे. याविषयी अधिक स्पष्ट करताना ब्लाँडेल म्हणाल्या, सिनेमाविषयी झटपट शिकण्याचा हा एक मार्ग आहे. ज्या क्षेत्रामधल्या तणावाच्या वातावरणामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्याविषयीची विविध कौशल्ये आपल्याला शिकता येतात. तसेच त्यांचे हस्तांतरण करण्यायोग्य प्रकारामध्येही करता येते.100 चित्रपट दिग्दर्शकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक तृतीयांश जणांनी आपल्या व्यावसायिक प्रवासामध्ये लघुपटाचा महत्वाचा भाग आहे असा उल्लेख केला आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. फोन (Phone) आणि इंटरनेट (Internet) या माध्यमांमुळे लघुपट (Short Film) अगदी सहजपणे जगाच्या सीमा ओलांडू शकतात. फ्रान्समध्ये क्लेर्मोंट फेरांड लघुपट महोत्सवाला अतिशय महत्त्‍व आहे. कान्सच्या खालोखाल जगातला दुसरा सर्वात प्रतिष्ठित असा हा लघुपट महोत्सव आहे. या महोत्सवात जगातल्या सात हजारांपेक्षाही जास्त लघुपटांचे प्रदर्शन केले गेले आहे.

- सेसिल ब्लाँडेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT