Shri Ganeshan Dainik Gomantak
मनोरंजन

Odisha: भरतनाट्यमचे जेष्ठ गुरु श्री गणेशन यांचे निधन

Odisha: श्री गणेशन हे मूळचे मलेशियाचे रहिवासी असून त्यांचे वय 60 वर्षे होते.

दैनिक गोमन्तक

Odisha: भरतनाट्यमचे ज्येष्ठ गुरु श्री गणेशन यांचे निधन झाले आहे. भुवनेश्वर येथे सादरीकरण करत असतानाच ते स्टेजवरच कोसळले. त्यानंतर श्री गणेशन यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

श्री गणेशन हे मूळचे मलेशियाचे रहिवासी असून त्यांचे वय 60 वर्षे होते. भरतनाट्यमच्या सादरीकरणासाठी ते भारतात आले होते. परंतु भुवनेश्वर येथे 'गीत गोविंद' यावर आपले नृत्य सादर करत करतानाच त्यांचा मृत्यू झाला.

आयोजकांनी दिलेल्या माहीतीनुसार, भरतनाट्यमच्या सादरीकरणापर्यत त्यांची प्रकृती उत्तम होती. डॉक्टरांच्या माहीतीनुसार, श्री गणेशन यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT