Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dainik Gomantak
मनोरंजन

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उलटा चश्मा' आता मोठ्या पडद्यावर...चित्रपटाची झाली घोषणा

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

Rahul sadolikar

'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 15 वर्षांपासून टेलिव्हिजनवर तसेच प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे. या शोला किती अभिनेत्यांनी निरोप दिला माहीत नाही, पण मालिका अजूनही लोकांच्या हृदयात आहे. 'तारक मेहता'मधील दयाबेन म्हणजेच दिशा वाकाणीच्या पुनरागमनाची चाहत्यांना अजूनही प्रतीक्षा आहे. 

या शोची लोकप्रियता आणि चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, निर्माता असित मोदी आता 'तारक मेहता का उल्टा चष्मा'वर चित्रपट बनवणार असल्याची मोठी बातमी आहे..

असित कुमार मोदी यांनी 2022 मध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा वर एक कार्टून फिल्म लाँच केली, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. नंतर त्यांनी राइम्स आणि गेमिंग मालिका आणली आणि तीही हिट झाली. गेमिंग सीरिजचे नाव होते 'रन जेठा रन', जी खूप आवडली होती. 

आता असित मोदींनी म्हटले आहे की, मला 'तारक मेहता' युनिव्हर्स बनवायचे आहे. असित कुमार मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या शोबाबतच्या त्यांच्या नियोजनाविषयी सविस्तर माहिती दिली.

'माध्यमांशी बोलताना असित मोदींना त्यांच्या सुपरहिट शोवर चित्रपट बनवण्याचा विचार आहे का, असे विचारले असता त्यांनी होकार दिला आणि सांगितले, 'होय, चित्रपटही बनणार आहे. एक अॅनिमेटेड चित्रपटही असेल. सर्व काही केले जाईल. आम्हाला टीएमकेओसीला मॉलसारखे बनवायचे आहे. सर्व काही होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT