Tara Sutaria
Tara Sutaria 
मनोरंजन

PHOTO: तारा सुतारिया गोव्याच्या आठवणीत

गोमंन्तक वृत्तसेवा

नवी दिल्ली: इन्स्टाग्रामवर आपल्या सुट्टीतील डायरीच्या आठवणींकडे सर्वांना आकर्षित करणारी तारा सुतारिया घरी राहूनच आपल्या चाहत्यांना गोव्याची आठवण करून देत आहे. तिने तीच्या इन्स्टाग्राम अकांउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री तारा सुतारियाने मंगळवारी आपले सनस्किडचे फोटो शेअर केले. आणि हे फोटो इंस्टाग्राम वर तीने आपल्या प्रशंसकासोबत शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये ती एकप्रकारे उन्हात चमकतांना दिसत आहे. जेव्हा सूर्याचे किरणं तीच्या चेहऱ्यावर पडतात तेव्हा तीची त्वचा चमकतांना दिसत आहे. तारा ने या फोटोमध्ये सुर्याकडे बघत एक पोझ फोटोत ब्लॅक स्ट्रॅपी आउटफिट मध्ये दिसत आहे. तिने या फोटोला थ्रोबैक टू स्लिपिंग मॉर्निंग इन गोवा, असे कॅप्शन दिले आहे. 'तडप', 'एक व्हिलेन 2' आणि 'हीरोपंती २' या  तीन चित्रपटांमध्ये तारा येत्या काही दिवसात दिसणार आहे. 'तडप' हा मिलन लूथरिया या तेलगू हिट 'आरएक्स 100' चा रिमेक आहे. सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. मोहित सूरीच्या ‘एक व्हिलन 2’ मध्ये जॉन अब्राहम दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूरसोबत तारा काम करतांना दिसणार आहेत.

तीला 'हीरोपंती' च्या दुसर्‍या पार्टसाठीही निवडले गेले आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असून अहमद खान या चित्रपटाचे दिग्दर्शित आहेत. दरम्यान, तारा तीच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत गुंतली आहे.  गोवा, कर्नाटक मध्ये शूटिंग पूर्ण झाल्यानंतर याच महिन्यात अभिनेत्री मुंबईत परतली . तारा तिच्या एक व्हिलन रिटर्न्सचा सह-कलाकार अर्जुन कपूरसोबत दोन्ही वेळी मुंबई विमानतळावर दिसली.

मिळालेल्या माहितीनुसार तारा अभिनेता अदर जैनला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. या अभिनेत्री ताराने मुख्य भूमिकेत असेलेला टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडे हीच्यासह 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. 'मरजावां' या अ‍ॅक्शन फिल्ममध्येही ती दिसली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

High Court Order: वृद्ध सासूसोबत राहण्यास पत्नीचा नकार; उच्च न्यायालयाने दिला घटस्फोटाचा आदेश

Goa Election 2024 Voting Live: राज्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT