Tamannaah Bhatia  Dainik Gomantak
मनोरंजन

Tamannaah Bhatia At USA: स्वातंत्र्यदिनानिमित्त तमन्ना भाटियाने अमेरिकेत उंचावली भारताची मान

Tamannaah Bhatia At USA: 'जेलर'ने अवघ्या तीन दिवसांत जगभरात 222.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दैनिक गोमन्तक

Tamannaah Bhatia At USA: अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या सर्वत्र चर्चेत आहे. एकीकडे त्याच्या वेब सीरीज आणि चित्रपट एकापाठोपाठ हिट होत असताना दुसरीकडे तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान देण्यात आला आहे.

तमन्नाला अमेरिकेतील न्यू जर्सी येथील एनजे इंडिया परेडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यात तिचा ग्रँड मार्शल म्हणून गौरव करण्यात आला. तमन्नाने ग्रँड मार्शल म्हणून इंडिया परेडमध्ये भाग घेतला आणि स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा केला आहे.

NJ परेडमध्ये भारतीय-अमेरिकन कॅलेंडर देखील प्रदर्शित केले गेले होते, जे आपल्या देशाची संस्कृती, परंपरा आणि राष्ट्राच्या कामगिरीबद्दल माहीती देते. या कार्यक्रमात नृत्य, संगीत आणि देशाची विविधता दाखवण्यात आली आहे. तमन्ना भाटिया ग्रँड मार्शल म्हणून त्याचा एक भाग बनली आहे. 2017 मध्येदेखील या इंडिया डे परेडमध्येही त्यांनी भाग घेतला होता.

तमन्ना भाटियाच्या मुव्ही प्रोजेक्टबद्दल बोलायचे तर ती नुकतीच रजनीकांत स्टारर 'जेलर' मध्ये दिसली आहे, ज्यामध्ये तिचे 'कवाला' हे गाणे खूप हिट होताना दिसत आहे. 'गदर 2' आणि 'OMG 2' सोबत 11 ऑगस्टला रिलीज झालेल्या 'जेलर'ने अवघ्या तीन दिवसांत जगभरात 222.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

या चित्रपटात देशभरात 127.10 कोटींची कमाई केली आहे. याशिवाय तमन्ना 'लस्ट स्टोरीज 2' आणि 'भोला शंकर' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. तिच्याकडे आता तीन चित्रपट आहेत, ज्यात हिंदी चित्रपट 'वेद', एक तामिळ आणि एक मल्याळम चित्रपट आहे. सध्या या चित्रपटांचे शूटिंग सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT