Tamannaah - Vijay Varma Dainik Gomantak
मनोरंजन

Tamannaah - Vijay Varma : हातात हात आणि चेहऱ्यावर लाली...तमन्ना - विजयचे डेटिंगचे फोटो व्हायरल

अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचे डेटिंगचे व्हायरल फोटो पाहिलेत का?

Rahul sadolikar

साऊथची अभिनेत्री तमन्ना आणि आपल्या अभिनयाने ओटीटीवर एक वेगळी ओळख निर्माण केलेला अभिनेता विजय वर्मा यांच्या अफेअरच्या बातम्या आता नवीन नाहीत. विजय आणि तमन्नाचे गोव्यातले फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते तेव्हापासुन दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी दोघांच्या चाहत्यांना धक्का दिला होता.

अभिनेत्री तमन्ना भाटियाचे 'बॉयफ्रेंड' विजय वर्मासोबतचे नवे फोटो व्हायरल होत आहेत. जेव्हा दोघे सार्वजनिक ठिकाणी एकमेकांचा हात धरताना दिसले तेव्हा पापाराझींनी त्यांना घेरले. हे फोटो पाहिल्यानंतर दोघेही लाजून चूर चूर झाल्याचे चाहते सांगत आहेत.

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...

1975 मध्ये आलेल्या 'खेल खेल में' चित्रपटातील 'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दूं, इस दुनिया से नहीं डरेंगे हम दोनो हे गाणं आठवतंय? जेव्हा तुम्ही तमन्ना आणि विजय वर्माचे फोटो पाहाल तेव्हा तुम्हाला या गाण्याचा प्रत्यय येईल...'. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्यावर चित्रित केलेल्या या गाण्याच्या ओळी आजकाल तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्यावर अगदी चपखल बसतात. दोघेही गेल्या अनेक महिन्यांपासून एकत्र फिरताना दिसत आहेत. दोघांच्या व्हायरल फोटोंमुळे सध्या सोशल मिडीयावर चर्चांना उधाण आलं आहे.

Tamannaah - Vijay Varma

तमन्ना आणि विजय दोघांची प्रेमकहाणी

दोघेही जगासमोर आले आणि दबलेल्या भाषेत आपलं प्रेम व्यक्त करू लागले. आता दोघेही हात धरून लाजेने लाल झालेले दिसत होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांच्या फॅन्सकडून व्हायरल फोटोंवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tamannaah - Vijay Varma

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा

 तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या डेटिंगच्या बातम्या तेव्हा समोर आल्या, जेव्हा ते दोघेही यंदाच्या न्यू इयर पार्टीमध्ये गोव्यात किस करताना दिसले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सर्वत्र या अफेअरची चर्चा सुरू झाली. यानंतर दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. त्यानंतर तमन्ना 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये दिसली होती. तमन्नाने एका मुलाखतीत उघड उघड दोघांच्या बाँडिंगबद्दल सांगितलं होतं

आता विजय आणि तमन्ना हात धरलेले दिसले. दोघेही एकमेकांचा हात धरून चालताना दिसले. दोघेही प्रेमात असल्याचा पुरावा त्यांचे फोटो देत आहेत. यापूर्वी तमन्नाने विजयसोबतचे नाते मान्य केले होते. 'तो माझ्या आनंदाची जागा आहे', असे त्यांनी सांगितले होते. विजयसोबत आपले खास नाते असल्याचेही त्याने सांगितले.

विजय वर्मा दिसणार या आगामी प्रोजेक्टमध्ये

विजय वर्माबद्दल बोलायचे झाले तर तो 'लस्ट स्टोरीज 2' चित्रपट आणि 'कलकूट' वेब सीरिजमध्ये दिसला होता. द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स आणि अफगानी स्नोमध्ये तो दिसणार आहे. तमन्नाबद्दल बोलायचे झाले तर ती 'जेलर', 'भोला शंकर', अरमानाई 4, वांद्रे आणि 'वेद' या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT