Tabu Bhola Shooting Dainik Gomantak
मनोरंजन

Tabu Bhola Shooting: 'भोला' च्या सेटवर अभिनेत्री तब्बू जखमी, शूटिंगदरम्यान घडली ही घटना

Tabu Bhola: तब्बू सध्या 'भोला' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री तब्बू सध्या तिच्या आगामी 'भोला' चित्रपटात व्यस्त आहे. हा एक अॅक्शन चित्रपट असणार आहे. याचे शूटिंग हैदराबादमध्ये होत आहे. दरम्यान, सेटवरून तब्बूसोबत अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. (Tabu Bhola Shooting News)

बुधवारी सकाळी अजय देवगणच्या ‘भोला’ या अ‍ॅक्शन चित्रपटात एका निडर, उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री तब्बू धाडसी स्टंट करताना थोडक्यात बचावली. हा त्या चित्रपटांपैकी (Movie) एक आहे ज्यामध्ये तब्बू अजय देवगणसोबत अनेक स्टंट करताना दिसणार आहे.

* अॅक्शन सीन दरम्यान ही घटना घडली

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना एका अॅक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान घडली जेव्हा ट्रक आणि मोटरसायकलची धडक झाली आणि टक्कर इतकी जोरदार होती की तब्बूच्या उजव्या डोळ्याच्या अगदी वरच्या काचेवर आदळली. त्याचवेळी, सेटवर उपलब्ध डॉक्टरांच्या मते, दुखापत फार खोल नव्हती, त्यामुळे टाके घालण्याची गरज नव्हती.

सेटवरील या घटनेनंतर अजय देवगणने तब्बूला आराम करण्यास सांगितले आहे. तसेच पूर्णपणे बरे होईपर्यंत शूटिंगमधून ब्रेक घ्यायला सांगितले आहे.

* या चित्रपटात हे स्टार्स दिसणार

अजय देवगण (Ajay Devagan) आणि तब्बूशिवाय 'भोला'मध्ये दीपक डोबरियाल, शरद केळकर आणि संजय मिश्रा हे कलाकारही दिसणार आहेत. त्याच वेळी, अजय देवगण या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होऊ शकतो. तब्बूबद्दल बोलायचे झाले तर ती अलीकडेच कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटात दिसली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT