Tabu Birthday Special Dainik Gomantak
मनोरंजन

Tabu Birthday Special : वयाच्या 52 व्या वर्षी तब्बू जगते लक्झरी लाइफ; नेट वर्थ जाणून व्हाल आश्चर्यचकित

Tabu Birthday Special : बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आज तिचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे.

दैनिक गोमन्तक

Tabu Birthday Special : बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आज तिचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. तब्बूचे खरे नाव तबस्सुम हाश्मी आहे, तिने 'माचीस' 'बॉर्डर', 'विरासत', 'चांदनी बार', 'चीनी कम' यांसारख्या चित्रपटांतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. 4 नोव्हेंबर 1970 रोजी जन्मलेल्या तब्बूने 1985 मध्ये 'हम नौजवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि आजही तब्बू तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

बॉलीवूडचे दिग्गज देव आनंद यांनी तबस्सुम हाश्मीला तब्बू हे नाव दिले होते हे फार लोकांना माहीत नसेल. तब्बू ही प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री शबाना आझमी यांची भाची असून वयाच्या 52 व्या वर्षी तिने स्वतःचे करोडोंचे साम्राज्य उभे केले आहे. लाखो हृदयांवर राज्य करणारी तब्बू अजूनही सिंगल आहे. तब्बूच्या वाढदिवसाच्यानिमित्त, तिच्या नेट वर्थबद्दल जाणून घेऊया.

चित्रपटांमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारणारी तब्बू एकटीच राजेशाही जीवन जगते. वयाच्या 15व्या वर्षापासून चित्रपटसृष्टीत काम करणारी तब्बू एका चित्रपटासाठी 2 ते 4 कोटी रुपये मानधन घेते. चित्रपटांव्यतिरिक्त तब्बू ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करते. तब्बू ही अभिनेत्री असण्यासोबतच बिझनेसवुमन देखील आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तब्बूची एकूण संपत्ती 22 कोटींच्या आसपास आहे. यासोबतच तब्बूला वाहनांचीही शौकीन आहे, तिच्याकडे ऑडी Q7, मर्सिडीज आणि जग्वार X7 यासह अनेक लक्झरी वाहने आहेत. तब्बूची मुंबईशिवाय हैदराबाद आणि गोव्यातही प्रॉपर्टी आहे.

तब्बूचे चित्रपट

2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी काही खास ठरले नसले तरी या वर्षी प्रदर्शित झालेला तब्बूचा 'भूल भुलैया 2' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होते. तब्बूने 'अस्तित्व', 'मकबूल' यांसारख्या चित्रपटांतून हे सिद्ध केले आहे की, ती व्यक्तिरेखा कोणतीही असो, ती आपल्या दमदार अभिनयाने सर्वांच्या मनात जीव फुंकते.

हेच कारण आहे की वयाच्या 52 व्या वर्षीही तब्बूकडे चित्रपटांची कमतरता नाही. तब्बू लवकरच 'कुट्टे', 'खुफिया' आणि 'भोला' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तब्बूचा 'दृश्यम 2' 18 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

SCROLL FOR NEXT