Taarak Mehta actress divorce Dainik Gomantak
मनोरंजन

जेठालालच्या 'त्या' पत्नीला धक्का! तारक मेहता फेम अभिनेत्रीचा 'घटस्फोट'; 13 वर्षांच्या संसारानंतर वेगळं होण्याचा निर्णय

Simple Kaul divorce: अभिनेत्री सिंपल कौल आणि तिचा पती राहुल लूंबा यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे

Akshata Chhatre

Simple Kaul divorce News: हिंदी मालिकांमधील बहुचर्चित मालिका तारक मेहता का उलटा चष्मा या जेठालाल पत्नी होऊन आलेली तसेच 'झिद्दी दिल माने ना' या लोकप्रिय मालिकेत 'कोयल रॉय सिद्दीकी'ची भूमिका साकारलेली अभिनेत्री सिंपल कौल आणि तिचा पती राहुल लूंबा यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. २०१० मध्ये विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याने नुकताच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

'आम्ही आताही कुटुंबासारखेच आहोत'

घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल बोलताना, अभिनेत्री सिंपल कौलने सांगितले की "हा निर्णय खूप अलीकडचा आहे. आम्ही दोघांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही खूप परिपक्व आहोत आणि आजही कुटुंबासारखेच आहोत.

मला अजूनही हे पटत नाही की, ज्या व्यक्तीला मी माझ्या आयुष्यातील इतकी वर्षं ओळखले, त्यापासून वेगळे होत आहोत." ती पुढे म्हणाली, "जेव्हा तुम्ही लग्न करता, तेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या कुटुंबाचा भाग बनतो आणि तो तसाच राहतो. मला माहीत नाही लोक असे नाते कसे तोडतात. मी आयुष्य प्रेम आणि आनंद जाणीवेनेच जगते. आणि पुढेही असेच जगणार आहे."

आधी लांबच्या नात्याबद्दल बोलली होती सिंपल

२०२३ मध्ये सिंपलने एका मुलाखतीत सांगितले होते की, राहुलच्या परदेशी कामामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला, तरीही त्यांच्यात खूप चांगले सामंजस्य असून, कामामुळे दोघांनाही आनंद मिळतो.

'शरारत', 'तारक मेहता का उल्टा चष्मा' यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिकेसाठी सिंपल कौल ओळखली जाते. अभिनयासोबतच ती एक यशस्वी उद्योजिकाही आहे. मुंबईत '१ बीएचके' आणि 'होममेड कॅफे' नावाचे तिचे रेस्टॉरंट खूप लोकप्रिय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT