Taapsee Pannu Dainik Gomantak
मनोरंजन

Taapsee Pannu: 'माझ्यासोबत निट बोला'; पापराझींसोबत तूतू-मैंमैं,पाहा व्हिडिओ

Taapsee Pannu Video: व्हिडीओमध्ये तापसी पापराझींवर संतापलेली दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

तापसी पन्नू ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तापसी ही वेगवेगळ्या विषयांवर तिचं मत मांडत असते. अनेक वेळा ती लोकांनी विचारलेल्या प्रश्नाला भन्नाट आणि मजेशीर पद्धतीनं उत्तर देते. तापसीच्या 'थप्पड' या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता लवकरच तापसीचा 'दोबारा' हा चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे तापसी सध्या प्रमोशन करत आहे. नुकताच तापसीचा एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तापसी ही फोटोग्राफर्सवर संतापलेली दिसत आहे.

तापसी (Taapsee Pannu) तिच्या दोबारा या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. हा चित्रपट 19 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तापसी मुंबईमधील (Mumbai) एका हॉटेलमध्ये गेली होती. यावेळी फोटोग्राफर्सनं तिचे फोटो काढण्यासाठी गर्दी केली. फोटोसाठी पोझ देण्यास थांबवत होते त्यावेळी तिने पापराझींना पोझ देण्यास नकार दिला तेव्हा तूतू-मैंमैं करत तापसी भडकली. तेथील फोटोग्राफर्सनं देखील तापसीला सडेतोड उत्तर दिलं.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये (Video) दिसत आहे की, तापसी हॉटेलमध्ये आल्यावर फोटोग्राफर्स तिच्या मागे धावतात. पण तापसी थांबत नाही. तापसीला एक फोटोग्राफर म्हणतो, 'मॅडम आम्ही खूप वेळ थांबलो आहोत.' यावर तापसी म्हणते, 'तुम्ही मला ओरडत का आहात? माझी यात काय चुक? तुम्ही माझ्यासोबत निट बोला.' यावर फोटोग्राफर म्हणतो, 'मॅडम आम्ही तुमच्यासोबत निट बोलत आहोत. आम्ही साडेचार वाजल्यापासून इथे थांबलो आहोत.' व्हिडीओच्या शेवटी दिसते की तापसी म्हणते, 'तुम्हीच नेहमी बरोबर असता. अॅक्टर चुकीचा असतो. काढा फोटो.'

तापसी पन्नूने 2012 साली 'चश्मे बद्दूर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले. त्यानंतर तिच्या सांड की आंख, बदला, जुडवा 2 आणि बेबी या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तापसीचा ब्लर हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT