Swara Bhasker Pregnancy Rumours Dainik Gomantak
मनोरंजन

Swara Bhasker Pregnancy Rumours : अभिनेत्री स्वरा भास्करच्या प्रेग्नंसीबद्दल आता नवा खुलासा

अभिनेत्री स्वरा भास्कर प्रेग्नंट असल्याच्या अफवांना सोशल मिडियावर चांगलेच उधाण आले आहे.

Rahul sadolikar

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करबद्दल ट्रोलर्स पुन्हा एकदा सोशल मीडियावर गलिच्छ बोलत आहेत. फेक मीडिया पोर्टल बनून काही ट्रोलर्सनी स्वरा भास्करच्या गरोदरपणाची बातमी पसरवली, त्यानंतर लोकांनी अभिनेत्रीला ट्रोल करायला सुरुवात केली. 

या बनावट स्क्रीनशॉटमध्ये स्वरा भास्कर जुलैमध्ये मुलाला जन्म देऊ शकते, असे लिहिले होते. पण नंतर त्या न्यूज पोर्टलने अधिकृत ट्विट करून संपूर्ण सत्य सांगितले. वृत्तवाहिनीने सांगितले की, ही फेक न्यूज आहे. त्यांच्या नावाने या खोट्या बातम्या चालवल्या जात आहेत. तर स्वरा भास्करने या वृत्तांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

न्यूज पोर्टलने दिली होती बातमी

एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका न्यूज पोर्टलने ही बातमी दिली होती  ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, 'बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर प्रेग्नंट झाली, पती फवाद अहमदने स्वतः याची पुष्टी केली आहे. अभिनेत्रीची प्रसूती जुलै महिन्यात होऊ शकते. या नायिकेने फेब्रुवारीमध्येच ८ वर्षांनी लहान फवादशी लग्न केले

ते ट्वीट खोटं

आता ज्या पोर्टलच्या नावाने ही फेक न्यूज चालवली जात होती, त्याच वृत्तवाहिनीने ट्विटरवर अधिकृत पोस्ट केली आहे. त्यांनी हे वृत्त खोटे आणि मूर्खपणाचे असल्याचे स्पष्ट केले. अधिकृत न्यूज पोर्टलने ट्विट केले की, 'अभिनेत्री स्वरा भास्करशी संबंधित हे बनावट ट्विट न्यूज 24 च्या नावाने सोशल मीडियावर शेअर केले जात आहे, जे पूर्णपणे बनावट आहे. आम्ही असे कोणतेही ट्विट केलेले नाही.

समाजवादी पार्टीच्या नेत्याशी लग्न

स्वरा भास्कर अनेकदा तिच्या राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत असते, पण आता तिच्या व्यक्तीगत आयुष्यात 'पॉलीट‍िकल एन्ट्री' झाली. स्वरा भास्करने (Swara Bhaskar) समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले.

स्वरा या वर्षाच्या सुरुवातीला 6 जानेवारीलाच विवाहबद्ध झाली होती. काही दिवसांपूर्वी स्वराने स्वतःचा आणि फहादचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, पण या फोटोत दोघांचेही चेहरे दिसत नव्हते. पण आता स्वराने जानेवारीत झालेल्या लग्नाची घोषणा केली आहे. स्वराचे पती फहाद अहमद हे समाजवादी पक्षाचे नेते आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT