Swara Bhaskar  Dainik Gomantak
मनोरंजन

Swara Bhaskar : "स्वराचे वडील म्हणतील गेली एकदाची पीडा" ट्विट्टरवर स्वरा भास्कर ट्रोल...

अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या ट्विट्टरवर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे

Rahul sadolikar

ट्विटर हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक त्यांची मतं मोकळेपणाने मांडत असतात, कित्येकदा सेलिब्रिटींना ट्रोल केलं जातं आता या ट्रोलिंगचा सामना अभिनेत्री स्वरा भास्करला करावा लागला आहे . ट्विट्टरवर युजर्स त्यांची मतं शेअर करत असतात. येथे बऱ्याचदा वेगवेगळ्या विचारांमुळे वाद होतात.

एखाद्याशी सहमत होऊ शकता आणि असहमत देखील असू शकता. पण आता हा प्लॅटफॉर्म ट्रोलिंगसाठी अधिक प्रसिद्ध झाला आहे. चर्चा कमी आणि लोकांचे वादच जास्त अशी स्थिती सध्या दिसत आहे. अभिनेत्री स्वरा भास्करच्या लग्नाची बातमी आली आणि ट्रोलर्स सक्रीय झाले. स्वराने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांच्याशी लग्न करताच ट्रोलिंगला जोरदार सुरूवात झाली आहे.

  बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करच्या लग्नाची बातमी या यूजर्सनी वाचताच विचित्र पद्धतीने ट्रोल करत आहेत. कित्येकांनी स्वराने मुस्लिम तरुणाशी लग्न केले म्हणुन तिच्यावर कमेंट्स केल्या आहेत. काहीजणांनी ती हिंदू विरोधात असल्याच्या कमेंटस केल्या आहेत.

काहीजणांनी तिच्या जुन्या ट्विट्टरचा संदर्भ देत कमेंटस केल्या आहेत . त्याने अभिनेत्रीचा पती फहाद अहमदला विचारणा केली. ट्रोलर्सनी स्वराला धर्मविरोधी ठरवून तिच्यावर टीकाही केली आहे.

काहींनी तर मीम्स तयार करुन स्वराच्या लग्नाची खिल्ली उडवली आहे. एका युजरने मीमद्वारे स्वराचे वडील म्हणतील 'गेली एकदाची पीडा' अशी टिप्पणी केली आहे. स्वरा भास्कर आपल्या निर्भिड स्वभावामुळे प्रसिद्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT