Gadar 2 Sunny Deol   Dainik Gomantak
मनोरंजन

Gadar 2 First Look : तब्बल 22 वर्षानंतर तारा सिंह पुन्हा पेटुन उठणार, गदर 2 चा फर्स्ट लुक आला समोर

अभिनेता सनी देओलचा ब्लॉकबस्टर चित्रपट गदरचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, फर्स्ट लुक आला समोर

Rahul sadolikar

अभिनेता सनी देओलच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना खिळवुन ठेवणारा गदरला रिलीज होऊन 22 वर्षे लोटली ;पण आजही त्यातला तारा सिंह प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सनी देओल आणि अमिशा पटेल यांची प्रमुख भूमीका असलेल्या या चित्रपटाचा सिक्वल आता नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गदर 2 चा फर्स्ट लुक समोर आला आहे.

2001 साली अनिल शर्मा दिग्दर्शित गदरने प्रेक्षकांना वेड केलं होतं. सनी देओलने काढलेला हॅंडपंप आजही प्रेक्षकांना आठवतो. आता नव्या गदरमध्ये काय पाहायला मिळणार याची उत्सुकता समोर आली होती.

झी स्टूडिओ ने इंस्टाग्रामवर एक रील वीडियो शेयर केला आहे. या रिलमध्ये 2023 मध्ये रिलीज होत असलेल्या मोठ्या प्रोजेक्ट्सची झलक दाखवण्यात आली आहे. 50 सेकंदाच्या या व्हिडीओत सनी देओलच्या गदरचीही झलक आपल्याला पाहायला मिळु शकते.

50 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये अजय देवगन चा मैदान, सलमान खान चा भाईजान, सोनू सूद चा फतेह, नवाजुद्दीन सिद्दीकीचा हड्डी या सगळ्या आगामी चित्रपटांची झलक बघायला मिळत आहे. त्यात शेवटी गदरचा लुक बघायला मिळतो.

यात सनी देओल बैलगाडीचे चाक उचलुन आपल्या तडफदार लुकमध्ये बघायला मिळत आहे.सनी देओलच्या फॅन्ससाठी त्याचा हा आगामी चित्रपट एक मोठी मेजवानी असणार आहे हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT