Sanjay Dutt Dainik Gomantak
मनोरंजन

Sanjay Dutt: मुन्नाभाईने दिल्या गांधी जयंतीच्या शुभेच्छा; पाहा video

दोन ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली जाते.

गोमन्तक डिजिटल टीम

देशात सर्वत्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देशातील प्रमुख नेत्यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली आहे. महात्मा गांधी यांना आदरांजली देण्यात नेत्यांसह अभिनेतेही आघाडीवर आहेत. पण, सिनेमात गांधीगिरी केलेल्या मुन्नाभाईने हटके पद्धतीने महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय दत्तचा मुन्नाभाई एम.बी.बी.एस आणि लगे रहो मुन्नाभाई हे दोन्ही चित्रपट प्रचंड गाजले. या चित्रपटांमुळे संजय दत्तला बॉलिवूडमध्ये नवसंजीवनी देखील मिळाली. मुन्नाभाई एम.बी.बी.एस मध्ये संजय दत्तच्या मामू आणि जादू की झप्पीने सर्वांची मने जिंकली. तर, लगे रहो मुन्नाभाई चित्रपटात संजूच्या प्रेमळ गांधीगिरीचे देखील कौतुक झाले. यातील अनेक प्रसंग लोकांना खळखळून हासवतात तसेच गांधीच्या शिकवणी देखील सांगून जातात.

याच चित्रपटात संजय दत्त जेव्हा गुन्हेगारी विश्व सोडून गांधीगिरीचा मार्ग अवलंबतो आणि भरमसाठ गांधीजीची पुस्तके वाचतो तेव्हा त्याला गांधीजी दिसू लागतात. याच चित्रपटातील एक प्रसंग संजय दत्तने आपल्या इंस्टाग्राम अकांऊटवर शेअर करत, गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, संजय दत्तच्या या व्हिडिओवरती अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी व्हिडिओ लाईक करत संजय दत्तलाही महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

Bhuvneshwar Kumar World Record: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक! तब्बल 1,430 दिवसांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच 2 चेंडूंवर नोंदवला विश्वविक्रम

Goa Under 23 Cricket: दिशांक मिस्कीनची एकाकी झुंज! नाबाद 97 धावांसह गोव्याला बिहारविरुद्ध विजयाची संधी

Ranji Trophy 2026: 40 पैकी 38 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या; गोव्याच्या फलंदाजांची रणजीत दयनीय अवस्था

Asian Para Games 2026: भारताच्या गोल्डन गर्लची कमाल! शीतल देवीने अवघ्या काही तासांत जिंकली दोन सुवर्णपदके; एशियन पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT