Suniel Shetty Dainik Gomantak
मनोरंजन

Suniel Shetty: बॉलीवूडच्या आण्णांचे वक्तव्य! मला माझ्या मुलांना भारतीय शाळांमध्ये शिकवायचं नव्हतं कारण...

Suniel Shetty: तेव्हा तीने अभिनय क्षेत्रात येण्याचे स्वप्न बोलून दाखवले होते.

दैनिक गोमन्तक

Suniel Shetty: सुनिल शेट्टी म्हणजे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. मात्र सध्या सुनिल शेट्टी त्याच्या कोणत्या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीदरम्यान सुनिल शेट्टीने आपल्या मुलांना भारतीय शाळांमध्ये शिक्षण देण्याची इच्छा नव्हती असे त्यांनी म्हटले आहे.

मी आधीच ठरवले होते की, माझ्या मुलांनी भारतीय शाळांमध्ये पाठवणार नाही. त्यांच्या शिक्षणासाठी मला अमेरिकन फॅकल्टी हवी होती असे त्याने या मुलाखतीदरम्यान म्हटला आहे. मी त्यांना अमेरिकन बोर्डमध्ये शिकवू इच्छित होतो.

भारतात न शिकवण्याचे काय आहे कारण

सुनिल शेट्टीने आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मी अभिनेता आहे किंवा सेलिब्रिटी आहे म्हणून आपल्या माझ्या मुलांना भारतातील शाळांमध्ये स्पेशल वागणूक देण्याची शक्यता होती आणि मला ते नको होते. इथे त्यांना हे सांगितले जाण्याची शक्यता होती की ते कोण आहेत किंवा ती कोणाची मुले आहेत.

मी त्यांना अशा वातावरणात पाठवू इच्छित होतो की, त्यांना या गोष्टींनी कोणताही फरक पडला नाही पाहिजे. मला वाटते की, मी ज्या विचारांनी त्यांच्या शाळेचा विचार केला होता तो यशस्वी झाला असे सुनिल शेट्टींनी म्हटले आहे. पुढे ते म्हणतात- मला आठवतंय माझे वडील म्हणायचे की यासाठी खूप पैसे लागतील.

जेव्हा आम्ही आथियाला आटलांटामध्ये अॅडमिशन घेतले होते. तेव्हा तिने आपल्या वडीलांना सांगितले होते की, मी इथे अॅडमिशन घेऊनही खूश नाही. तेव्हा तीने आपल्याला अभिनय क्षेत्रात येण्याचे स्वप्न बोलून दाखवले होते.

सुनिल शेट्टी यांनी आपल्या मुलीला इथे येणाऱ्या अपयशाला ती सामोरे जाऊ शकेल का असा प्रश्न विचारला होता. कारण या क्षेत्रात अनिश्चितता आहे अशी आठवण सुनिल शेट्टींनी आपल्या मुलाखतीदरम्यान सांगितली आहे.

दरम्यान, सुनिल शेट्टीने 1992 मध्ये आलेला बलवान चित्रपटातून डेब्यू केले होते. मात्र 1994 ला आलेल्या मोहरा चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. त्यावर्षीच आलेली गोपी किशन हा चित्रपटदेखील चांगलाच गाजला होता. अलिकडेच त्यांनी Hunter Tootega Nahi Todega ओटीटीवर डेब्यू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT