Natu Natu RRR Dainik Gomantak
मनोरंजन

RRR चा डंका! राम चरण आणि ज्युनियर एनटीआर सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन..

RRR: आरआरआरमधील नाटू नाटू या गाण्याला ग्लोब अवॉर्ड मिळाला होता

दैनिक गोमन्तक

RRR: एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपट येऊन बराच काळ होऊन गेला तरी आजही हा चित्रपट चर्चेत असतो. आरआरआरमधील नाटू नाटू या गाण्याला ग्लोब अवॉर्ड मिळाला होता. ऑस्करमध्येही आरआरने आपले वर्चस्व टिकून ठेवले आहे.

ऑस्कर-2023 मध्ये 'बेस्ट ओरिजनल स्कोर' श्रेणीमध्ये आरआरआरला नामांकनही मिळाले आहे. आता ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांना क्रिटिक्स चॉईस सुपर अवॉर्ड( Award)मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकन मिळालं आहे. महत्वाचं म्हणजे टॉम क्रूझ आणि ब्रॅड पिट या दिग्गज अभिनेत्यांचीदेखील या श्रेणीत निवड झाली आहे.

दरम्यान, गुरुवारी क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सची नामांकनं जाहीर करण्यात आली असून 'टॉप गन: मेवरिक' साठी टॉम क्रूझ आणि 'बुलेट ट्रेन' साठी ब्रॅड पिट यांनाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले आहे. आता सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोण पटकावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

SCROLL FOR NEXT