S.S.Rajamauli Dainik Gomantak
मनोरंजन

RRR नंतर राजामौली यांचा आणखी एक धमाका! दादासाहेब फाळकेंचा बायोपिक लवकरच चाहत्यांच्या भेटीला

S. S. Rajamouli: खरं तर बायोपिक बनवणं खूप अवघड आहे. पण 'फादर ऑफ इंडियन सिनेमा'वर बायोपिक बनवणे त्याहूनही आव्हानात्मक आहे.

दैनिक गोमन्तक

S. S. Rajamouli: 'बाहुबली' आणि 'आरआरआर' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर आता एसएस राजामौली एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत.

आत्तापर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक बायोपिक बनवले गेले आहेत, पण आता भारतीय चित्रपटसृष्टीच्या जनक दादासाहेब फाळके यांच्यावर बायोपिक बनवले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे 'मेड इन इंडिया' असे नाव आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते नितीन कक्कर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून एसएस राजामौली या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

'मेड इन इंडिया'ची घोषणा करताना, एसएस राजामौली यांनी ट्विटरवर (एक्स) चित्रपटाची कथा ऐकून ते भावूक झाल्याचे म्हटले आहे. या बायोपिकसाठी त्यांची टीम तयार असल्याचे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

एसएस राजामौली यांचा नवा चित्रपट 'मेड इन इंडिया'

एसएस राजामौली यांनी मेड इन इंडियाच्या घोषणेचा टीझर शेअर केला आणि लिहिले, 'जेव्हा मी पहिल्यांदा कथा ऐकली, तेव्हा मी भावूक झालो. खरं तर बायोपिक बनवणं खूप अवघड आहे. पण 'फादर ऑफ इंडियन सिनेमा'वर बायोपिक बनवणे त्याहूनही आव्हानात्मक आहे.

दादासाहेब फाळके

दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हटले जाते. ते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक होते. 1913 मध्ये त्यांनी देशातील पहिली फिचर फिल्म 'राजा हरिश्चंद्र' बनवली. पण भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देण्यासाठी दादासाहेब फाळके यांना खूप कष्ट घ्यावे लागले आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया संघर्षाने घातला गेला

महिलांनी चित्रपटात काम करायला सुरुवात दादासाहेब फाळकेंबरोबरच केल्याचे म्हटले जाते. दादासाहेब फाळके यांच्याकडे भारतीय चित्रपटसृष्टी सुरू करून चित्रपट बनवण्याचे कोणतेही साधन नव्हते. पण त्यांनी धीर सोडला नाही. आता एसएस राजामौली त्यांची कथा चित्रपटाच्या पडद्यावर आणणार असल्याने आत्तापासूनच या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाने ऑस्करमध्ये डंका गाजवला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने एसएस राजामौली चांगलेच चर्चेत होते. आता ते दादासाहेब फाळकेंवर चित्रपट बनवत असल्याने ते पून्हा एकदा चर्चांचा भाग बनले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: अरेरे! रेड कार्पेटवर पाकिस्तानी उपपंतप्रधान तोंडावर पडले, सुरक्षारक्षकांनी कसंबसं सावरलं; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Viral Video: हत्तीने कारला खेळण्यासारखं हवेत उडवलं, ड्रायव्हर थोडक्यात बचावला; व्हिडिओ पाहून भरेल धडकी

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोन अटकेत, रचला होता मोठा कट

Viral Post: "शेर कभी शिकार करना नहीं भूलता!" रोहितच्या वादळी खेळीवर युवीची प्रतिक्रिया; पोस्ट होतेय व्हायरल

VIDEO: होली स्पिरीट चर्चमध्ये 'पाम संडे' उत्साहात! पवित्र आठवड्याला प्रारंभ

SCROLL FOR NEXT