South Superstar Suriya Dainik Gomantak
मनोरंजन

South Superstar Suriya : धगधगत्या आगीतून आला तारणहार...सुपरस्टार सुर्याच्या आगामी चित्रपटाची झलक

साऊथचा सुपरस्टार सुर्याचा आगामी कंगुवाची झलक सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Rahul sadolikar

सुर्याचा आगामी चित्रपट कांगुवा सोशल मिडीयावर चर्चेत आहे. साऊथचा सुपरस्टार सुर्याचा 23 जुलैला आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुर्याच्या या खास दिवशी निर्मात्यांनी त्याच्या 'कांगुवा' चित्रपटाची झलक रिलीज केली आहे. या चित्रपटात सुर्यासोबत दिशा पटनीही असणार आहे. 'कांगुवा'ची कथा खूपच रंजक आहे.

सुर्याचा लूक

साऊथ स्टार सुर्या त्याच्या या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपट 'कंगुवा'साठी सज्ज झाला आहे. 23 जुलै रोजी सुर्या आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवशी, निर्मात्यांनी चित्रपटाच्या जबरदस्त फर्स्ट लुकचे अनावरण केले, यात सुर्या डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. 

'कांगुवा'मध्ये सुर्या दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणार आहे, ज्यामुळे चित्रपटाची जोरदार चर्चा रिलीजआधीच सुरू आहे. प्रॉडक्शन टीम वर्षाच्या अखेरीस पहिल्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करेल आणि येत्या उन्हाळ्याच्या हंगामात तो प्रदर्शित होईल असा अंदाज आहे.

9 व्या शतकापासुन 21 व्या शतकापर्यंत

सिरुथाई सिवा दिग्दर्शित, कांगुवा एक जबरदस्त मनोरंजन देण्याची नक्कीच हमी देतो कारण चित्रपटाची कथा 9 व्या शतकापासून 21 व्या शतकापर्यंतच्या दीर्घ कालावधीत पसरलेली आहे. या चित्रपटाची निर्मिती स्टुडिओ ग्रीन आणि यूव्ही क्रिएशन्सने केली आहे आणि त्यात योगी बाबू, किंग्सले, कोवई सरला, आनंद राज आणि बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीसह अनेक प्रतिभावान कलाकार आहेत.

चित्रपटाचा टिझर रिलीज

चित्रपटाचा टीझर लगेचच व्हायरल झाला आहे. एका चाहत्याने ट्विटरवर लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा सूर्या अण्णा. हा कांगुव्याचा फक्त एक छोटासा तुकडा आहे पण तो रोमांचक आहे आणि चित्रपट एक थरारक अनुभव देईल.

कंगुवा 3D मध्ये रिलीज होणार

कंगुवा'चे संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे. याव्यतिरिक्त, हा चित्रपट 3D मध्ये रिलीज होणार आहे आणि 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध असेल, जो अनेक प्रदेशांमधील लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. सुर्याने यापूर्वी चित्रपटाचे मोशन पोस्टर त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यामुळे चाहते आणि चित्रपट प्रेमींमध्ये खळबळ उडाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT