This song will be known all over the world as Dapoliche Gaane performed by Dapolikar
This song will be known all over the world as Dapoliche Gaane performed by Dapolikar 
मनोरंजन

आपल्या लाडक्या दापोलीला मिळणार गाण्यातून नवी ओळख

गोमन्तक वृत्तसेवा

दाभोळ : सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या दोपोली तालूक्याची महती सांगणाऱ्या दमदार गाण्याचे रेकॉर्डिंग आणि शूटिंग होणार आहे.  लवकरच या गाण्याने दापोली आणि दोपोलीकार दणाणणार आहेत. ‘वाट घमघम वळणाचा रस्ता... कोलीम भाकरीचा रस्सा .... बंदरावर शेल्फी काढतीया मांदेली ....’ असे या गाण्याचे बोल असून  या गाण्यावर दापोलीकरांचे पाय थिरकतांना दिसणार आहेत.  

प्रसिद्ध संगीतकार हरिश चव्हाण यांनी कोकणातील प्रसिद्ध कवी प्रा. कैलास गांधी यांच्या गीताला संगीतसाज चढविला आहे. आणि ह्या गीतासाठी तालुक्‍यातील सुमारे 35 हून अधिक गायक, कलाकारांचे सहकार्य लाभणार आहे. या गाण्याला स्वरबद्ध करण्यासाठी लवकरच गायकांची तसेच कलाकारांची ऑडिशन घेण्यात येणार आहे. यात निवड झालेल्या गायक, कलाकारांना या गाण्यामध्ये संधी देण्यात येणार आहे. तेव्हा ऑडिशनसाठी दापोली येथील दीप्ती शेवडे व नंदिता पतंगे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दापोलीकरांनी केलेले ‘दापोलीचे गाणे’ अशी या गाण्याची ओळख जगभर होणार असा विश्‍वास चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.  नृत्य तसेच इतर सादरीकरणासाठी देखील स्थानिक कलाकारांचा सहभाग या गाण्यात असणार आहे.

दापोलीला ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून संबोधले जाते, विकेंड आणि सुट्यांच्या दिवशी दापोली तालुक्‍यातील पर्यटनस्थळी पर्यटकांचा गर्दी बघायला मिळते. दापोलीतील समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे आणि ऐतिहासिक स्थळांकडे  पर्यटकांची जास्त ओढ दिसून येते.

म्हणूनच दापोलीचे स्वत:चे एक दमदार असे गीत असावे, अशी नागरीकांचा ईच्छा आहे. या गीताला सुंदर अशी चालही देण्यात आली आहे. दापोलीतील काही प्रसिद्ध ठिकाणी या गीताचे शुटिंग केले जाणार आहे. त्यामुळे आता लवकरच दापोलीकर ‘वाट घमघम वळणाचा रस्ता... कोलीम भाकरीचा रस्सा .... बंदरावर शेल्फी काढतीया मांदेली .... ’या गाण्याच्या बोलावर आणि तालावर समस्त दापोलीकरांची पावलं थिरकणार आहेत.

अशी असणार कलाकारांसाठी ऑडिशन टेस्ट

गायकांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, माता रमाई, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे यांच्या भूमिका साकारू शकतील असे चेहरे, त्याचबरोबर मावळे, मंगळागौर या कार्यक्रमांसाठी महिला आणि मुली, पालखी सोहळा, बाल्या डान्ससाठी मुले, वारकरी संप्रदाय, नवरा नवरी अशा भूमिकांसाठी फक्‍त दापोली तालुक्‍यातील कलाकारांची ऑडिशन घेण्यात येणार आहे. ही ऑडिशन टेस्ट दापोली शहरातील नर्सरी रोडवरील पेन्शनर्स असोसिएशन हॉल येथे घेतली जाणार आहे.  उद्यापासून म्हणजेच 21 व 22 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून ही ऑडिशन टेस्ट सुरू होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Ponda Hospital : फोंडा इस्पितळात ऑगस्टपर्यंत सुविधा पुरवा: विजय सरदेसाई

‘’...सहमतीने संबंध ठेवणे चुकीचे म्हणता येणार नाही’’; HC ची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

SCROLL FOR NEXT