Sonam Kapoor  Dainik Gomantk
मनोरंजन

Sonam Kapoor: सोनम कपूरने कंटेट क्रिएटरला पाठवली कायदेशीर नोटीस; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Sonam Kapoor: सोनम कपूर, आनंद आहुजा आणि त्यांच्या फॅशन ब्रँडची प्रतिष्ठा खराब केल्याचा आरोप तिच्यावर आहे.

दैनिक गोमन्तक

Sonam Kapoor: बॉलीवूडचे कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटामुळे, कधी त्यांच्या सोशल मिडियावरील पोस्टमुळे तर कधी त्यांच्या वक्तव्यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनलेले दिसतात. आता अभिनेत्री सोनम कपूर मात्र एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने एका कंटेंट क्रिएटरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. युट्युबरने तिच्या व्हिडिओमध्ये तिची, पती आनंद आहुजा आणि त्यांच्या फॅशन ब्रँडची प्रतिमा खराब केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. अशा परिस्थितीत सोनम कपूरने याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली आहे

सोनम कपूरला रोस्ट करणाऱ्या युट्युबरचे नाव रागिणी आहे. सोनम कपूर, आनंद आहुजा आणि त्यांच्या फॅशन ब्रँडची प्रतिष्ठा खराब केल्याचा आरोप तिच्यावर आहे. यूट्यूबरने सोनम कपूरला तिच्या 'वीरे दी वेडिंग' चित्रपटातील काही डायलॉग्स घेऊन रोस्ट केले आहे.

काही महिन्यांपूर्वी रागिणीने 'सोहम पापूर नॉट अ रोस्ट व्हिडिओ' नावाचा व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये अभिनेत्रीची खिल्ली उडवली गेली. या वादानंतर रागिणीच्या फॉलोअर्समध्येही वाढ झाली आहे. मिळालेल्या माहीतीनुसार या गदारोळानंतर रागिणीच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे. व्हिडीओवर अजूनही लोकांकडून खूप कमेंट्स आणि प्रतिक्रिया येत आहेत.

रागिनीने पुन्हा केले रोस्ट

कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतरही, YouTuber रागिणीने पुन्हा एकदा अभिनेत्रीचे नाव न घेता स्वतःचा पक्ष मांडत सोनम कपूरची खिल्ली उडवली. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने लिहिले की त्याने अभिनेत्रीची तुलना हॅरी पॉटर मालिकेतील लॉर्ड वोल्डेमॉर्टशी केली आहे.

रागिणीचे म्हणणे आहे की तिने बनवलेले सर्व व्हिडिओ सोनम कपूरच्या 'वीरे दी वेडिंग' चित्रपटातील विधानावर आधारित आहेत. तिने अभिनेत्रीचा अपमान केला नाही तर तिला पाठिंबा दिला आहे. यानंतर काही लोक रागिणीलाही सपोर्ट करू लागले आहेत.

रागिनी स्वतःला कंटेंट क्रिएटर म्हणवते जी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर सक्रिय आहे. तिचे वय सुमारे 20 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. ती विशेषतः रोस्टचे व्हिडिओ बनवते. रागिनीचे यूट्यूबवर 14 हजार फॉलोअर्स असून जवळपास 62 व्हिडिओ शेअर केले आहेत. इंस्टाग्रामवर तिचे ४० हजार फॉलोअर्स आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT