Sonam kapoor baby shower Dainik Gomantak
मनोरंजन

अनिल कपूर मुंबईत करणार सोनमची भव्य बेबी शॉवर पार्टी, खास बॉलिवूड स्टार्संना आमंत्रण

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिचा प्रेग्नेंसी पिरेड खूप एन्जॉय करत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिचा प्रेग्नेंसी पिरेड खूप एन्जॉय करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनमचा आता तिसरा ट्रायमेस्टर सुरू आहे. ती लवकरच पती आनंद आहुजासोबत तिच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे. दरम्यान, आई होणारी सोनम कपूर पुन्हा एकदा ग्रॅंड बेबी शॉवर करणार आहे. ज्याचे आयोजन तिचे वडील अनिल कपूर मुंबईत करत आहेत. त्यासाठी तिने अनेक प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना आमंत्रित केले आहे. (Sonam kapoor baby shower)

सध्या सोनम पती आनंदसोबत लंडनमध्ये आहे. जिथे तिने नुकताच बेबी शॉवर शूट केला आहे.आता लंडननंतर सोनम पुन्हा एकदा तिच्या बेबी शॉवरचे विधी मुंबईत करणार आहे. तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिच्या भव्य बेबी शॉवर पार्टीचे आयोजन केले आहे.

सोनमच्या बेबी शॉवर पार्टीचे आयोजन तिची मावशी कविता सिंह यांच्या वांद्रे येथील बंगल्यावर होणार आहे. जिथे दोघांचे लग्न पार पडले होते. हा भव्य सोहळा 17 जुलै रोजी आयोजित केला जाईल ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी उपस्थित राहतील आणि बाळाच्या जन्मासाठी आशीर्वाद देतील.

स्वरा भास्कर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, अमृता अरोरा, मलायका अरोरा, आलिया भट्ट, नताशा दलाल, जॅकलीन फर्नांडिस, दीपिका पदुकोण, मसाबा गुप्ता आणि राणी मुखर्जी या अभिनेत्री सोनमच्या बेबी शॉवर पार्टीला हजेरी लावणार आहे. सोनम कपूरच्या घरातील जान्हवी कपूर, खुशी कपूर, शनाया कपूर, अंशुला कपूर, अर्जुन कपूर, मोहित मारवाह हे देखील उपस्थित राहणार आहेत.

कपूर आणि आहुजा फॅमिली एक्साईटेड

कपूर आणि आहुजा फॅमिली सोनमच्या प्रेग्नेंसीबद्दल खूप उत्सुक आहे. काही दिवसांपूर्वी, एका मुलाखतीदरम्यान, सोनमचे वडील अभिनेता अनिल कपूर यांना तिच्या आई होण्याबद्दल विचारण्यात आले आणि त्यांनी उत्तर दिले, "जेव्हा मला सोनमच्या गर्भधारणेबद्दल कळले तेव्हा मी भावूक झालो आणि मला खूप आनंद झाला. कारण ती खूप वेगळी भावना आहे. मात्र अशा परिस्थितीत सोनमने कधीही ओव्हर प्रोटेक्टिव आई बनू नये असे मला वाटते."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT