मनोरंजन

Sonam Kapoor Baby Boy: सोनम कपूरच्या घरी श्रीकृष्ण जन्मला

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या आयुष्यात अखेर तो क्षण आला आहे, ज्याची ती अनेक महिन्यांपासून वाट पाहत होती. सोनम कपूर आणि आनंद आहुजा (Sonam Kapoor, Anand Ahuja) यांच्या घरी आज खूप आनंदाचा क्षण असून, सोनम कपूरने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

हो ! सोनम कपूर आई झाली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. सोनमचे चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. या बातमीने साहजिकच आहुजा कुटुंब आणि कपूर कुटुंबीय खूप खूश आहेत. आई आणि मुलगा दोघेही निरोगी असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि आलिया भट्टची (Alia Bhatt) सासू नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी या वृत्ताला दुजोरा देत सोनम-आनंदचे अभिनंदन केले आहे. नीतू कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शुभेच्छा देणारे एक लव्ह कार्ड शेअर केले आहे. सोनम कपूरने देखील हेच कार्ड आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

नीतू कपूर यांनी असे लिहिले आहे की, '20 ऑगस्ट रोजी आम्ही एका सुंदर मुलाचे स्वागत केले. या प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, परिचारिका, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांचे खूप खूप आभार. ही फक्त सुरुवात आहे, परंतु आपल्याला माहित आहे की आता आपले जीवन पूर्णपणे बदलले आहे. सोनम आणि आनंद. अनिल कपूर आणि सुनीता कपूर (Anil Kapoor, Sunita Kapoor) यांचे अभिनंदन.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT