Sonam Kapoor Instagram
मनोरंजन

Sonam Kapoor ने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत शेअर केलं बाळाचं नाव

Sonam Kapoor Baby's Name : सोनम कपूर आणि आनंद आहुजा नामकरण सोहळा पार पडला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या बाळाच्या नामकरण सोहळ्याची चर्चा सोशल मिडीयावर गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. सोनमने तिच्या बाळाचा पहिला फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी आपल्या बाळाचे नाव जाहीर केले आहे. सोनमच्या बाळाचे नाव 'वायू' (Vayu) ठेवण्यात आले आहे. सोनमने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक गोंडस फॅमिली फोटो शेअर केला आहे.

सोनम कपूरच्या मुलाचे नाव 'वायू' ठेवले आहे

सोनम कपूरने (Sonam Kapoor) तिच्या मुलाचे नाव वायु कपूर आहुजा असे ठेवलं आहे. नावाबरोबरच सोनम कपूरने कॅप्शनमध्ये बाळाच्या नावाचा अर्थही सांगितला आहे. 'वायू हा हिंदू धर्मग्रंथातील पाच घटकांपैकी एक आहे. हनुमान हे भीम आणि माधवांचे आध्यात्मिक पिता आहेत आणि ते वायूचे अविश्वसनीय शक्तिशाली स्वामी आहेत. या अर्थांसह सोनम कपूरने तिच्या मुलाचे नाव वायु असे ठेवलं आहे. सोनमने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव होतो आहे. या फोटोत तिघांनी पिवळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी 20 ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या नामकरणाबाबत अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या. अखेर या चर्चांनी पूर्णविराम देत सोनमने स्वत: बाळाचा फोटो शेअर करत त्याचे नाव जाहीर केले आहे. या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतो आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT