Double XL Dainik Gomantak
मनोरंजन

Double XL: सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी यांच्या डबल एक्सएल चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

डबल एक्सएल चित्रपट बॉडी शेमिंगच्या मुद्यावर भाष्य करते

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) सध्या त्यांच्या 'डबल एक्सएल' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. दोन्ही अभिनेत्री पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. याच चित्रपटामधून क्रिकेटर शिखर धवन (Shikhar Dhawan) देखील बॉलिवूड (Bollywood) पदार्पण करणार आहे. त्यामुळे सध्या डबल एक्सएल चित्रपटाची सगळी चर्चा होत आहे.

'डबल एक्सएल' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर फोन भूत या कतरिना कैफच्या चित्रपटाशी टक्कर होणार आहे. 'डबल एक्सएल' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्लस-साईज असलेल्या महिलांना दैनंदिन जीवनात बॉडी शेमिंगचा सामना लागतो, याचवरून दोघींची मैत्री होते. 'डबल एक्सएल' चित्रपट फॅट फोबिया या नाजूक विषयाला अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडताना दिसत आहे. ट्रेलरची सुरुवात हुमा कुरेशीच्या शिखर धवनला भेटण्याच्या स्वप्नाने होते, जे स्वप्न तिची आई उद्धवस्त करते. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर नेटवर धुमाकूळ घालत आहे.

तसेच, सोनाक्षी सिन्हा या चित्रपटात एक फॅशन डिझायनरचे काम करत असून, ती तिचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण लठ्ठपणाच्या समस्येमुळे तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांची मैत्री होते आणि दोघेही लंडनला जातात.

या चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांनी 15 ते 20 किलो वजन वाढवले ​​आहे. भारत आणि यूकेमध्ये मोठ्या प्रमाणावर शूट केलेला 'डबल एक्सएल' अधिक वजन असलेल्या महिलांची कथेवर भाष्य करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT