Sirkus Movie Collection Dainik Gomantak
मनोरंजन

Sirkus Movie Collection : तगडी स्टारकास्टसुद्धा 'सर्कस'साठी चांगली कमाई करु शकली नाही.. पहिल्या दिवशीचा गल्ला एवढाच?

रोहित शेट्टीचा बहुचर्चित सर्कस पहिल्या दिवशी काही विशेष कमाई करु शकला नाही.

Rahul sadolikar

रोहित शेट्टीच्या सर्कसचा ट्रेलर रिलीज झाल्यापासुन प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल उत्सुकता होती ;पण शुक्रवारी रिलीज झालेला हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात सपशेल अपयशी ठरला आहे.

सलग सुपरहिट चित्रपट देण्याचा फॉर्म्युला अवगत असलेला रोहित शेट्टी या चित्रपटाच्या माध्यमातुन बऱ्याच काळाने कॉमेडीचा तडका घेऊन येणार असं वाटत होतं पण प्रेक्षकांची ही अपेक्षा फोल ठरली आहे कारण चित्रपटाची कमाई अत्यंत तोकडी आहे.

रणवीर सिंह, जॅकलिन फर्नांडिस, जॉनी लिवर, संजय मिश्रा अशी तगडी स्टारकास्ट असुनही रोहित शेट्टीचा सर्कस बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाई करु शकला नाही. 'सर्कस'ला ३२०० स्क्रिन्स मिळाल्या असुन देशभरात १० हजार शोज लागले आहेत. या सर्वांचा विचार करता 'सर्कस पहिल्या दिवशी ८ ते 10 कोटींचा गल्ला जमवेल असं वाटलं होतं.

सर्कसच्या कमाईबाबतचा हा अंदाज चुकला असुन चित्रपटाने केवळ ६.७५ इतकाच गल्ला जमवला आहे. चित्रपटाची स्टारकास्ट, प्रमोशन या सगळ्याचा विचार करता ही कमाई अत्यंत तोकडी आहे. 70 कोटींचे बजेट असणारा हा चित्रपट आता कशी वसुली करतो हे पुढच्या काही दिवसांत होणाऱ्या कमाईतुन लक्षात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT