Babul Bihari Arrested Dainik Gomantak
मनोरंजन

Babul Bihari Arrested: विकृतीचा कळस, या गायकाने केलं अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोजपूरी गायक बाबुल बिहारी या गायकाला अटक करण्यात आली आहे.

Rahul sadolikar

Babul Bihari Arrested: सध्या बाबुल बिहारी या गायकामुळे भोजपुरी इंडस्ट्री जोरदार चर्चेत आहे. एका विकृत घटनेमुळे हा गायक चर्चेत आला आहे.एका घटनेने भोजपुरी सिनेसृष्टी सध्या खुपच चर्चेत आली आहे.

भोजपुरी इंडस्ट्रीतील अभिनेते आणि अभिनेत्रीच नव्हे तर गायकही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यातच आता भोजपुरी इंडस्ट्रीतुन धक्कादायक बातमी समोर आली आहे.

बाबुल बिहारीची विकृती

प्रसिद्ध भोजपुरी गायक अभिषेक उर्फ ​​बाबुल बिहारी याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बाबुल बिहारी हा भोजपुरी गायक आहे. त्याचं खरं नाव अभिषेक असं आहे. बिहारमध्ये वास्तव्यास असलेल्या बाबुल बिहारीचं युट्यूब चॅनेलही आहे.

13 वर्षीय मुलीने सांगितली घटना

पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरीकडे, पोलिसांनी बुधवारी पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांची चौकशी केली. यात 13 वर्षीय पीडितेने संपूर्ण घटना क्रम पोलिसांना सांगितला.

मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण दोन वर्षे जुनं आहे. गायक बाबुल बिहारी याने दोन वर्षांपूर्वी एका १३ वर्षीय मुलीला फूस लावली. तिच्याशी मैत्री केल्यानंतर तो तिला हॉटेलच्या खोलीत घेऊन गेला, तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याचबरोबर तिचे काही फोटोही काढले. या घटनेनंतर तरुणीने आरोपीपासून लांब राहिली.

सोशल मिडीयावरची पोस्ट

इतके दिवस पीडितेच्या कुटुंबीयांनाही या घटनेची माहिती नव्हती. बाबुल बिहारी याने दोन वर्षांनंतर या घटनेची आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली, त्यानंतर तो पकडला गेला.

पीडितेच्या कुटुंबीयांनी ही फोटो पाहिल्यानंतर त्यांनी मुलीची चौकशी केली. त्यानंतर पीडितेने त्या घटनेची माहिती दिली. यानंतर मुलीच्या पालकांनी बुधवारी पोलिसात धाव घेतली.

पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल...

पीडितेची चौकशी केल्यानंतर सेक्टर-14 पोलिस स्टेशनमध्ये पॉक्सो कायदा आणि आयटी कायद्यांतर्गत आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला.

एफआयआरच्या आधारे, आरोपीला काही तासांत अटक करण्यात आली, पोलिस प्रवक्ते सुभाष बोकन म्हणाले, त्याला शहर न्यायालयात हजर केले गेले आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

SCROLL FOR NEXT