Sidhu Moose Wala Dainik Gomantak
मनोरंजन

Sidhu Moose Wala हत्या प्रकरणातील आरोपी परदेशातुन अटक

गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येतील मुख्य आरोपी सचिन बिश्नोई याला अझरबैजानमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) हत्या प्रकरणातील आरोपी परदेशातुन अटक केली आहे. हत्येतील मुख्य आरोपी सचिन बिश्नोई याला अझरबैजानमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंजाब पोलीस आणि भारतीय एजन्सी अझरबैजानच्या संपर्कात असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू आहेत. पंजाबी गायकाच्या हत्येचा कट रचणारा सचिन बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. हत्येचा कट होताच तो दिल्ली विमानतळावरून विमान घेऊन देशाबाहेर गेला असल्याचे बोलले जात आहे. सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपींना पकडण्यात मोठे यश मिळाले आहे.

याशिवाय अनेक आरोपींना पोलिसांनी पकडले आहेत. त्याचवेळी अमृतसरमधील पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या एका गावात चकमकीत तीन आरोपींना ठार करण्यात आले. त्यांच्याबाबत पोलिसांनी सांगितले की, तिघेही सिद्धू मूसवाला हत्याकांडात सामील होते आणि पोलिस त्यांच्या शोधात आले होते.

पथकाला पाहताच त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत ते ठार झाले आहे. मानसाच्या जवाहरके गावात ३० मे रोजी सिद्धू मुसेवाला यांची बदमाशांनी हत्या केली होती. तब्बल आठवडाभरानंतर पोलिसांना या हत्याकांडाचा खुलासा करण्यात यश आले आणि काही लोकांना अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT